Breaking

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्रा. डॉ. रघुनाथ साळुंखे यांची निवड*



प्रा.डॉ. रघुनाथ साळुंखे, नूतन अधिष्ठाता, आंतर विद्याशाखीय


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा  या  समूह विद्यापीठातील   आंतरविद्याशाखीय  विद्याशाखेचे   प्रभारी अधिष्ठाता म्हणून  विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील  भूगोलशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख  प्रा. डॉ. रघुनाथ साळुंखे  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.   

     प्रा. डॉ .साळुंखे ह्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागाचे  शिक्षक म्हणून  कार्य केलेले असून Socio-Economic Facilities in Drought Prone Area of Sangli District (Maharashtra): A Geographical Analysis या विषयातून त्यांनी पीएच. डी. हे पदवी संपादित केलेली असून. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकशित झालेले आहेत. सध्या ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे भूगोलशास्त्र  अभ्यास मंडळाचे  अध्यक्ष म्हणून  देखील कार्यरत आहेत. 

     त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी, कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के,  प्र. कुलसचिव  डॉ. विजय कुंभार, प्रा. डॉ. व्ही. के. सावंत, प्रा. डॉ. राजन मोरे, प्रा. डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ. धनाजी जाधव, डॉ. हेमंत उमाप, प्रि. डॉ. ज्ञानेश्वर म्हके, प्रि. डॉ. बी. टी. जाधव व प्रि. डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. गणेश निवेकर, डॉ. अमोल खोबरागडे, डॉ. मनीषा पाटील, प्रा. डॉ. एन. बी. माने, , प्रा. डॉ. ए. पी. तोरणे, डॉ. टी. डी. महानवर डॉ. उदय शिंदे, डॉ. सर्फराज मुजावर व सौ. बीना निपाने यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा