![]() |
सभासदांना लाभांश वाटप करताना चेअरमन प्रा.के.बी.पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. पी.सी.पाटील, मॅनेजर राहुल पाटील, मा.संचालक व सभासद |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये असणाऱ्या अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना १३ टक्के लाभांशचे वाटप करण्यात आले. सभासद, ठेवीदारांची हित जोपासणारी व वेळेप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपणारी आपली पतसंस्था म्हणून याचा उल्लेख होतो.
आज शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना जाहीर केलेला १३ टक्के लाभांश दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.के.बी.पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील यांच्या हस्ते लाभांशाचे वाटप सभासदांना करण्यात आले. याप्रसंगी डॉ.के.बी.पाटील म्हणाले, डॉ. सुभाष अडदंडे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली अनेकांत पतसंस्थेची उत्तम घोडदौड सुरू आहे. तसेच सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या माध्यमातून पतसंस्थेची आर्थिक उलाढाल प्रगती पथावर आहे. असंच सहकार्य व संस्थेच्या सर्व घटकांकडून मिळाले तर भविष्यात यापेक्षाही अधिक हित सभासद व ठेवीदारांचे जपले जाईल.
याप्रसंगी संचालक प्रा.सौ.एम.एस.पाटील, प्रा.डॉ. व्ही. व्ही. चौगुले,मॅनेजर श्री. राहुल पाटील,सुधाकर पाटील व उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम,प्रा.भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभासदांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत व योग्य लाभांश वितरित करण्याबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा