Breaking

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

*प्रा.सौ. सुजाता गोमटेश्वर पाटील यांनी इंग्रजी विषयातून केली पीएच. डी. पदवी संपादन ; मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.सौ. सुनंदा शेळके*


प्रा.सौ. सुजाता गोमटेश्वर पाटील इंग्रजी विषयातील पीएच.डी.पदवी प्राप्त


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी चे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका सौ.सुजाता गोमटेश्वर पाटील यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कडून पीएच.डी. पदवी संपादन केली. प्रा.सौ. पाटील यांनी 'पोर्टेयल ऑफ देवदासीज ऍज  सबाल्टन इन सिलेक्टेड इंग्लिश नॉव्हेल्स' या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनंदा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ.अक्षय सरोदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजन गवस, डॉ. अशोक बाबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे व प्राचार्य डॉ.सुभाष शेळके यांनी अभिनंदन केले.

पीएच.डी. मार्गदर्शिका प्रा.डॉ.सौ. सुनंदा शेळके

       प्रा. सुजाता पाटील यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या प्रा.डॉ.सौ. सुनंदा शेळके या स्वतः इंग्रजी विषयातील निष्णात प्राध्यापिका आहेत. डॉ.सौ. शेळके या अत्यंत कुशल मार्गदर्शक, उत्तम निवेदिका, सुप्रसिद्ध कवियत्री, लेखिका व गझलकार म्हणून सुपरिचित आहेत. उत्तम वाणीच्या माध्यमातून शेकडो व्याख्याने सादर केली आहेत.डॉ. शेळके या विविध पुरस्कारानी सन्मानित आहेत. कला व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून एक उत्तम कलाकार म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. मानवतावादी विचार व सामाजिक बांधिलकी जपत ते समाजाचा कार्य करण्यात तत्पर आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पेपरच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटविला आहे.

     प्रा.सौ. सुजाता पाटील या दानोळी गांवच्या कन्या असून आई-वडिलांची प्रेरणा,समर्थ साथ व आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू प्राथमिक व  माध्यमिक शिक्षण दानोळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतले.  १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून त्या डिस्टीकशन मध्ये पास झाल्या. यानंतर कोल्हापूरच्या कमला कॉलेज मधून डी.एड. परीक्षा अव्वल श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या. यानंतर  प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील यांचेशी विवाहबद्ध झाल्या.

    प्रा.सौ.पाटील यांना खऱ्या अर्थाने माहेरी मिळालेले सुसंस्कार आणि स्वतःची शिकण्याची जिद्द व धडपड त्याचबरोबर त्यांचे पती जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी समर्थ साथ व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. या जोरावर त्यांनी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधून शिक्षण घेत इंग्रजी विषयातील बी. ए. ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये संपादन केली. तसेच प्रा.सौ.पाटील यांनी के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर येथून एम.ए. ही पदवी इंग्रजी विषयातून संपादन केली. याचवेळी त्यांनी पीएच.डी.ही पदवी प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले होते.त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेल्या बाहुबली विद्यापीठाच्या जनतारा हायस्कूलमध्ये नोकरी प्राप्त झाली. जनतारा शाळे मध्ये शिक्षिका म्हणून सेवेत असताना धाडसी नेतृत्व, प्रामाणिकपणा, इंग्रजी भाषेवरील उत्तम प्रभुत्व, अध्यापनातील कौशल्य, बुद्धीचातुर्य, कामातील कार्यशीलता व सकारात्मक ऊर्जा या सारख्या गुण वैशिष्ट्यानी स्वतःचे व्यक्तिमत्त्व बहुश्रुत व परिपूर्ण केले होते. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांना आकर्षित केले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आपले अध्यापनाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले होते.मात्र उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या ध्येय उराशी बाळगून जनतारा हायस्कूलमध्ये त्या प्रामाणिकपणे आपली सेवा बजावीत होत्या. त्याचवेळी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी अर्थात सेट (SET)  ही परीक्षा सन २०१६ मध्ये उत्तीर्ण झाल्या आणि सीनियर कॉलेजमध्ये नोकरी मिळविण्याचा स्वप्नाला बळ मिळाले.

   सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जवळपास चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जयसिंगपूर कॉलेजची जाहिरात आली आणि मन प्रफुल्लित झाले. कारण त्या कॉलेजच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या. योगायोगाने सीनियर कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापिका म्हणून त्यांना नोकरी मिळाली. यानंतर खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात झाली.त्यांचे पती डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास, दिलेल साथ आणि वेळोवेळी केलेले उचित मार्गदर्शन यामुळे त्यांना हे सर्व शक्य झाले.  सन २०२० मध्ये जयसिंगपूर कॉलेजच्या इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी  पीएच.डी.ची विद्यार्थी म्हणून त्यांना स्वीकारले आणि उत्तम मार्गदर्शनाच्या माध्यमातून पीएच.डी.पदवी संपादन करण्यात यशस्वी झाल्या.यासाठी डॉ. सुनंदा शेळके यांचे पती प्राचार्य डॉ.सुभाष शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

     प्रा.सौ. सुजाता पाटील यांचे सामाजिक योगदान पाहता 'पाणी फाउंडेशन मजले' या ठिकाणी वृक्षारोपण करण्यामध्ये सक्रिय सहभागी होता. ते आज तागायात हे कार्य प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्या सेवा पूर्ण करतात.प्रा.सौ.पाटील या विविध रचनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रियाशील बनवण्यासाठी  प्रयत्नशील असतात. कलेची आसक्ती असल्याने कला व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतात. यापूर्वी त्या त्या जनतारा हायस्कूल मध्ये असताना उत्तम निवेदिका म्हणून नावाजलेल्या होत्या. जयसिंगपूर कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगत करण्यासाठी NAAC माध्यमातून त्या कटिबद्ध आहेत. संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता जपत असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेपरचे सादरीकरण केले आहे.

      ग्रामीण पार्श्वभूमी असताना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीची घोडदौड वाखण्याजोगी आहे. एक महिला प्राध्यापिका म्हणून त्यांच्या यशाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होते.

      प्रा.सौ. सुजाता पाटील यांनी (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा