![]() |
मार्गदर्शन करताना जी.के.जी घोडावत कन्या कॉलेजचे प्रा.डॉ. गौतम ढाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.एल.कदम, पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे व कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.डी.खळदकर |
प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलताना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. गौतम ढाले म्हणाले, राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय संविधान हे सक्षम आहे. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भरीव योगदान महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ. नंदकुमार कदम व पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे उपस्थित होते.
प्रारंभी राज्यशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. खंडेराव खळदकर यांनी उपस्थित घटकांचे स्वागत करून व प्रास्ताविकेच्या माध्यमातून व्याख्यान आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.
डॉ.ढाले पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं संविधान आणि विशेष करून त्याचा सरनामा अर्थात उद्देशिका त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थ सखोलपणे जाणून घेतला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व ध्यानात घेऊन लोकांनी व्यक्त झाले पाहिजे. अंतिम सत्ता लोकांची असते त्यामुळे लोकांच्या सार्वभौम सत्तेचा संविधान महत्त्वाची मानते .भारत विविध राज्यांचे मिळून एक राष्ट्र असल्यामुळे इथल्या संघराज्याची एकात्मतेचा जयघोष संविधान करते. व्यक्तीला श्रद्धा ,उपासना यासारखे धर्म स्वातंत्र्य आहेच पण राष्ट्राला धर्म असणार नाही हा धर्मनिरपेक्षतेचा विचार महत्वाचा आहे. घटनेला अभिप्रेत असलेल्या समाजवादात या देशात कोणीही अन्न, वस्त्र आणि निवारा यापासून वंचित राहू नये अशी व्यवस्था आणून पाहणारा आहे.आपली लोकशाही ही एक मत एक पत मानणारी आहे.
ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे म्हणाले, भारतीय संविधान हे या देशातील प्रत्येक घटकासाठी दीपस्तंभ आहे. त्यामुळे या संविधानाचा मान राखणे हे आपल्या प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, संविधान निर्मिती आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक नेते स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचा उल्लेख केला.
सरते शेवटी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, उपप्राचार्य प्रा.भरत आलदर प्रा.माधुरी कोळी, प्रा.कविता चानकणे, प्रा.सुरज चौगुले,प्रा.बाळासाहेब पाटील, प्रा.विशाल बडबडे , प्रथमेश कोळी व ज्युनियर कॉलेज मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास ज्युनियर विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा