![]() |
आमदार मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते जिलेबी वाटप सोबत संपादक अब्दुलभाई बागवान व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूरातील ऐतिहासिक क्रांती चौकात संविधानचा आवाज या लोकप्रिय साप्ताहिकाच्या वतीने मोफत जिलेबी वाटप व संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिरोळ विधानसभेचे आमदार मा.राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात त्यानंतर सर्व मान्यवर व विविध शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी भारतीय संविधान दिनाचा औचित्य साधून संविधानाचा आवाज या साप्ताहिकेचे संपादक अब्दुलभाई बागवान यांनी मोफत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार मा.राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगरसेवक मा.चंद्रकांत जाधव (घुणगीकर), मा. मिलिंद भिडे,बंडा मिनीयार, रमेश शिंदे,राजेश शिंदे, मा.सुरज भोसले,डॉ.असिफ देसाई, साहेबलाल मुल्लाणी, डॉ. अतीक पटेल,बंडू ऊरणकर, रफिक शेख, नवाजभाई मुजावर, नियाज अपिजे, जावेद नदाफ साहेब, बशीर शेख, बाबू गाडीवडर, प्रा.डॉ.दिपक सुर्यवंशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते मोफत जिलेबी वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना संपादक मा.अब्दुलभाई बागवान यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोफत जिलेबी वाटप व कै.श्री.राम कृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर जयसिंगपूरचा दुसरीच्या वर्गात शिकणारा कु.रविराज प्रभाकर माने या विद्यार्थ्यांने संविधानावर उत्तम पद्धतीने भाषण केले.
सदर कार्यक्रमास जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना संपादक अब्दुलभाई बागवान म्हणाले, भारतीय संविधान दिन हा सर्व भारतीयांचा राष्ट्रीय सणासारखा दिवस आहे. यानिमित्ताने संविधानाचा जागर करणे व मोफत जिलेबी वाटपाच्या माध्यमातून लोकांचं तोंड गोड करून संविधान दिन साजरा करणे हा हेतू होता यासाठी बऱ्याच घटकांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साप्ताहिक संविधानचा आवाजचे संपादक मा.अब्दुलभाई व अन्य साथीदाराने उत्तम पद्धतीने केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रभाकर माने यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा