![]() |
सुटा सदस्य प्राध्यापक ३१ ऑक्टोबर हा दिन काळा दिवस म्हणून नोंदविताना |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : केंद्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून कर्मचाऱ्याचे भविष्य काळोखात लोटण्याचा निर्णय दि. ३१ ऑक्टोबर २००५ ला घेतला त्यामुळे हा दिवस देशातील सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काळा दिवस ठरलेला आहे. त्यामुळे सदर शासनाच्या जुलमी धोरणाचा निषेध म्हणून मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर ,२०२३ हा दिवस राज्यभर 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात आला. याच पार्श्वभूमीवर एम.फुकटो या राज्यपातळीवर प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसाठी लढणाऱ्या सुटा या लढाऊ संघटनेने मंगळवार ३१ ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सुचित केले होते.
याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेजचे सुटा प्रतिनिधी प्रा.डॉ. टी.जी.घाटगे यांनी सर्व सुटा सदस्य प्राध्यापकांना सदर दिवस काळा दिवस म्हणून साजरा करून निषेध नोंदविणे असल्याची माहिती दिली. यानुसार सर्व सुटा सदस्य प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून शासन धोरणाचा निषेध केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा