![]() |
६० वा दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : सोमवार दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठात संपन्न होणाऱ्या ६० वा दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अधिसूचनेचे पालन करण्यासंदर्भातचे आवाहन डॉ. अजितसिंह एन. जाधव संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठीची अधिसूचना
१) विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात सोमवार, दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी ११.३० वाजता संपन्न होत आहे. या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून श्री. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व कुलपती शिवाजी विद्यापीठ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. एस. एस. मंथा माजी अध्यक्ष AICTE, नवी दिल्ली आणि सीईओ, महाप्रीत स्टार्ट-अप आणि नॉलेज सेंटर (MSKC) महाराष्ट्र सरकार हे उपस्थित राहणार आहेत.
२) ६० वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पद्धतीने विद्यापीठात संपन्न होणार आहे.
३) दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवाहनानुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचे खादी सलवार कुर्ता/कमीझ किंवा जोधपुरी (पुरुषांसाठी) व पांढऱ्या /मोती रंगाची खादीची साडी किंवा सलवार कुर्ता (महिलांसाठी) असा पोषाख परिधान करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
४) दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानवस्त्राची परतावा अनामत रक्कम रु.६५०/- आणि भाडे नापरतावा रु. २५/- आकारण्यात येणार आहे.
५) ज्या विद्यार्थ्यांनी टपालाव्दारे (By Post) पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचा विकल्प, अर्ज भरताना निवडला आहे. त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभ संपन्न झालेवर अर्जावरील पत्यावर पोस्टाने पाठविण्यात येतील.
६) सर्व संलग्नित तसेच स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी, अर्ज भरताना In Person असा विकल्प निवडला आहे. अशा स्नातकांची पदवीप्रमाणपत्रे, विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभादिवशी सकाळी ७:३० ते ११:०० या वेळेत आणि समारंभ संपल्यानंतर सायंकाळी ६:०० वाजेपर्यत विद्यापीठामध्ये वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत केली जातील. (स्नातकांनी पदवीप्रमाणपत्र स्वीकारताना शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र इ. यापैकी एक) वितरण अधिकारी यांना दाखवून पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करावीत.)
७) ६० व्या दीक्षांत समारंभासाठीच्या व्यासपीठावर देण्यात येणाऱ्या, पीएच.डी. व पारितोषिक प्राप्त स्नातकांची यादी व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in/60convocation) या सदरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
८) पदवीप्रमाणपत्र क्रमांक माहितीसाठी विद्यापीठ संकेत स्थळावर दिलेल्या लिंकचा वापर करावा. link-https://studentapps.unishivaji.ac.in/findbooth/
7378656036
उत्तर द्याहटवा2020078897
उत्तर द्याहटवा