Breaking

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

*खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो : विस्तार अधिकारी श्री.अनिल ओमासे यांचे प्रतिपादन*


क्रीडा महोत्सवामध्ये मार्गदर्शन करताना विस्तार अधिकारी अनिल ओमासे, जयसिंगपूर शिक्षण मंडळाचे केंद्रप्रमुख मेघना देसाई, मुख्याध्यापक आर.आय.पोवार 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर :  गुरुवार दिनांक १४ व १५  डिसेंबर २०२३ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर अत्यंत थाटामाटात  संपन्न झाले.क्रीडा  महोत्सव उद्घाटन प्रसंगी विस्तार अधिकारी श्री.अनिल ओमासे व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयसिंगपूर शिक्षण मंडळाचे केंद्रप्रमुख मा. मेघन देसाई हे होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.आय.पोवार उपस्थिती होते.

    विस्तार अधिकारी श्री.अनिल ओमासे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,मानवी आयुष्यामध्ये खेळायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचा सांगोपांग विकासाला गती प्राप्त होते.


    कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उत्तम भाष्य करताना मेघन देसाई  म्हणाले, क्रीडा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करणे हा हेतू असतो.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना  शालेय जीवनातील खेळाचे महत्त्व सांगून बहुमोल मार्गदर्शन केले. 

    दोन्हीही मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्री. व्ही.एम.चव्हाण यांनी क्रीडा शपथ दिली.


      मा.मुख्याध्यापक आर.आय.पोवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू मांडला. पाहुण्यांचा परिचय श्री.एस. के.सुतार यांनी करून दिला. 

    या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा प्रमुख श्री.एस. व्ही.हजारे यांनी मानले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ.ए.के.भिलवडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा