✍🏼 प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ (रजि.) जयसिंगपूर. ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांच्यावतीने येथे ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेचे भव्य पद्धतीने आयोजन वैशाली बुध्द विहार, लुंबिनीवन, धम्मनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
सदरची धम्मपरिषद ही मार्गशीर्ष पौर्णिमा मंगळवार दि. २६/१२/२०२३ सकाळी ९ ते सायं. ५.०० या वेळेत मान्यवर व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे अशी माहिती जयसिंगपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या परिषदेस पूज्य भिक्खू संघाची उपस्थिती असून धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदन्त डॉ. उपगुप्तजी महास्थवीर (पुर्णा-परभणी)(सचिव, अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र राज्य)
धम्म परिषदेचे उद्घाटक कल्याणमित्र आयु. डॉ. एस.पी. गायकवाड साहेब ,नांदेड (माजी अध्यक्ष, दि पिपल्स् एज्युकेशन सोसायटी, मुंबई)
पूज्य भदन्त प्रा. डॉ. यशकश्यपायन महास्थवीर (धम्म मार्गदर्शक जयसिंगपूर), पूज्य भदन्त प्रा. डॉ. एम्. सत्यपाल महास्थवीर (पाली भाषा विभाग प्रमुख, मिलींद कॉलेज, छ. संभाजीनगर)
प्रमुख उपस्थिती पूज्य भिक्षुणी बुध्दकन्याजी थेरी (छ. संभाजीनगर) पूज्य भदन्त आर. आनंद स्थवीर (वसगडे, कोल्हापूर),पूज्य भदन्त धम्मधर स्थवीर (छ. संभाजीनगर),पूज्य भदन्त संबोधी (वसगडे, कोल्हापूर),पूज्य भदन्त राहूल (वसगडे, कोल्हापूर)
कार्यक्रम : सकाळी १०.०० वा. धम्म ध्वजारोहण , पू. भिक्खू संघास भोजन दान व दुपारी १२ ते ५ भिक्खू संघाची धम्मदेसना
सदर कार्यक्रमास सर्व अबालवृद्धांनी, उपासक/उपासिकांनी, बहुजनांनी उपस्थित राहून सक्रीय सहभाग घेऊन, तथागत बुध्दांच्या धम्मात समर्पित होऊया यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ (रजि.) जयसिंगपूर व संलग्न संस्था यांचे वतीने देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा