![]() |
प्रा.सौ.मधुरा कुलकर्णी -पुजारी यांनी कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयात पीएच.डी. पदवी संपादित केली. |
![]() |
पीएच.डी. मार्गदर्शक प्रा.डॉ. राम नाईक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
नृसिंहवाडी : सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाडच्या प्रा.मधुरा कुलकर्णी -पुजारी यांनी कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयात पीएच.डी. पदवी संपादित केली.पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.राम नाईक होते.
प्रा.सौ. मधुरा कुलकर्णी यांनी "दि स्टडी ऑफ पोटेन्शिअँलिटी ऑफ ॲग्री टुरिझम बिझनेस इन कोल्हापूर डिस्ट्रिकट" या विषयावरील पीएच.डी. शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. पीएच.डी. मार्गदर्शक डॉ.राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोधप्रबंध पूर्ण केला. यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.एस. महाजन, कॉमर्स अँड मॅनेजमेंट अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव व प्रा.डॉ.के.मारुळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाडचे कार्यशील चेअरमन व माजी नगराध्यक्ष श्री.जयरामबापू पाटील, संचालक श्री विजय पाटील, प्र.प्राचार्य डॉ. आर.एस कदम,कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. एम. एस. दबडे, डॉ. सारंग भोला, डॉ. पी. पी. कांबळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कामी त्यांना त्यांचे पती श्री.चिंतामणी पुजारी व आईचेही बहुमोल सहकार्य मिळाले.
प्रा.मधुरा कुलकर्णी -पुजारी या एक हरहुन्नरी, चतुरस्त्र, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचयाचे आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांची शैक्षणिक प्रगतीची घोडदौड सुरू आहे. हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पीएच. डी. पदवी प्राप्त करणे ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मुळात प्रा.मधुरा कुलकर्णी या अगोदर सेट परीक्षा व एम.बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. Pसंशोधनात्मक कार्य करण्याची विद्यार्थी दशेपासून असलेली आवड व त्या दृष्टीने केलेले अथक परिश्रम, कुटुंबीयांची मिळालेली मोलाची साथ यामुळे त्यांना हे सुयश संपादित करता आले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका, इनोव्हेटिव्ह आयडिया च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे आणि सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. म्हणूनच त्यांची विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून ओळख आहे.
प्रा.सौ.मधुरा कुलकर्णी या शैक्षणिक प्रगती बरोबर आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात. त्यांनी नृसिंहवाडीत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे. उत्तम वक्तृत्व, स्पष्ट वक्त्या,प्रसन्न व्यक्तिमत्व आणि ज्ञानसंपन्न व्यक्तित्व हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्य आहेत.
जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रा.सौ. मधुरा कुलकर्णी- पुजारी म्हणाल्या, पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याने मला खूप आनंद होतो आहे. पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. यापुढेही संशोधनात्मक कार्य वाढवण्यासाठी ,समाजाला त्याचा लाभ होण्यासाठी, संशोधनात्मक क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्या कटिबद्ध असणार आहे
पीएच.डी. पदवी संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा