Breaking

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये नवमतदार जनजागृती व नोंदणी शिबिराचे आयोजन*


शिरोळ तहसील कार्यालय व जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नव मतदार जनजागृती व मतदार नोंदणी शिबिर


     *प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये नवमतदार  जनजागृती व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार श्री.अनिलकुमार हेळकर उपस्थित राहणार आहेत.

      मुख्य राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार *मा. जिल्हाधिकारी श्री राहुलजी रेखावार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक साक्षरता मंचची स्थापना केली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर श्रीमती मोहिनी चव्हाण,तसेच शिरोळ तहसील कार्यालय सहा.मतदार नोंदणी अधिकारी व मा. तहसीलदार श्री.अनिलकुमार हेळकर याच्या उचित मार्गदर्शन व निवडणूक मंचच्या माध्यमातून १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नव मतदार नोंदणी शिबिर आयोजन शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर,२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आली आहे. यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाच्या वतीने मंडल अधिकारी संजय सुतार व त्यांची टीम उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य, डॉ. सुरत मांजरे यांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन मतदार नोंदणी करून राष्ट्रीय कार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


अधिक संपर्कासाठी : 

*नोडल अधिकारी,*

१) डॉ. प्रभाकर माने,राष्ट्रीय सेवा योजना (९८२३१२००७६)


२) डॉ. खंडेराव खळदकर,राष्ट्रीय सेवा योजना (८२७५८९६१००)


*कॅम्पस अँम्बेसिडर*

१) भोलू शर्मा, राष्ट्रीय सेवा योजना


२) प्रथमेश कोळी, राष्ट्रीय सेवा योजना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा