![]() |
१९९३ बॅचचे विद्यार्थी - शिक्षक |
मालोजीराव माने; कार्यकारी संपादक
शिरोळ : श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, शिरोळ येथील सन १९९३ मधील ९ वी - १० वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला. तब्बल ३० वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी तत्कालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
जुने क्षण, जुने किस्से व धम्माल जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वजण भावना सागरात बुडाले होते. जुनेच मित्र पण नव्याने परिचय देताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. हे सर्व दृश्य पाहून त्यांच्या शिक्षकांनाही भरून आले होते, "बरेच स्नेहमेळावे पाहिले पण असा स्नेहमेळावा पाहिला नाही", असे आनंदोद्गार शिक्षकांनी काढले.
यावेळी श्री शितोळे सर, डी. ए. पाटील सर, मदवाने सर, खोत सर, गंगधर सर, यु. एस. पाटिल मॅडम, व्होरे मॅडम, माळी सर, सेवक आंबी मामा, कोल्हापुरे मामा, संजय कोळी इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यासाठी १०८ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी फोटो - व्हिडीओ शूट, गाणी, फनी गेम्स, स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या स्नेह मेळाव्याचे नियोजन - रमेश फ्ल्ले, संतोष कारदगे, निलेश शिरोळकर, रमेश काळे, वर्षा नलवडे,प्रशांत पोतदार, दिपक शिंदे,दत्तात्रय कोळी (DY) व अन्य सहकाऱ्यांनी चोख पार पाडले. या नियोजनबध्द आयोजनासाठी सर्वांनी त्यांचे विशेष आभार देखील मांडले, व असा योग पुन्हा पुन्हा यावा अशी इच्छाही सर्वांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा