![]() |
नव मतदार जनजागृती व मतदान नोंदणी शिबिरात मार्गदर्शन करताना शिरोळचे तहसीलदार मा.अनिलकुमार हेळकर, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व मंडल अधिकारी संजय सुतार |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तहसील कार्यालय व राज्यशास्त्र विभाग जयसिंगपूर कॉलेज चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "नवमतदार नोंदणी व मतदार जागृती शिबिर" आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळचे तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर प्रमुख अतिथी होते. मंडल अधिकारी संजय सुतार व अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
तहसीलदार मा. अनिल कुमार हेळकर म्हणाले, माननीय जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावर यांच्या आदेशाप्रमाणे नव मतदार नोंदणी व जागृती अभियान राबवण्यात येत आहे. ते म्हणाले, वास्तव परिस्थितीत शाळा-महाविद्यालय ही लोकशिक्षणाचे सक्षम व प्रभावी माध्यम असून यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही प्रकियेत तत्परतेने सहभाग होणे गरजेचे आहे. याकरिता वय वर्ष 18 वर्षे पूर्ण झालेल्या वा 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जूलै व 1 ऑक्टोबर रोजीच्या अहर्ता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच मतदार नमुना फॉर्म 6 हा अचूक पध्दतीने भरावा. या फॉर्म सोबत स्वतःचे आधार कार्ड व पालकांच्या मतदान कार्डची सत्यप्रत जोडावी जेणेकरून मतदान यादीत नाव येताना इतरत्र जाणार नाही वा संबंधित मतदाराला मतदानापासून वंचित राहता येणार नाही. या शिवाय आपण सर्व विद्यार्थी उपस्थित मित्रांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आपल्या परिसरातील मतदानास पात्र असणाऱ्या व्यक्तीस ही कळवावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी उत्तम करिअर साठी सुंदर मार्गदर्शनही केले.
मंडल अधिकारी मा.संजय सुतार यांनी कॉलेजमधील युवक युवतींना निवडणुकीचे महत्त्व सांगून ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.
जयसिंगपूर चे तलाठी सचिन घाटगे यांनी मतदार नोंदणी ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने कशी करावी याबाबत मौखिक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही व्यवस्था असून या लोकशाही व्यवस्थेचा मतदार हा कणा आहे.तसेच भारत हा युवकांचा देश असून या युवकांनी अधिकतम नवमतदाराची नोंदणी केली पाहिजे.
प्रारंभी कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. नितीन सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, जी.के.जी घोडावत कन्या कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गौतम ढाले, डॉ.राजू कोळी,प्रा. सुरज चौगुले,प्रा. माधुरी कोळी, प्रा. कांबळे,प्रा. विश्रांती माने,प्रा. परशुराम माने, कॉलेज मतदार ब्रँड अँबेसिडर प्रथमेश कोळी, ऋतुजा सावंत व एन.एस.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन शिरोळ तहसील कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा