Breaking

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

ई कचऱ्याचे संकलन करत गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 

ई- कचरा संकलन करताना प्रमुख पाहुणे , शिक्षक व विद्यार्थी


✍🏼मालोजीराव माने, कार्यकारी संपादक 

     लोकशाही टिकवण्यासाठी जसे संविधान गरजेचे आहे, त्याचप्रकारे आता लोकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रदूषणमुक्त निसर्गाची गरज आहे. आणि संविधानात नमूद हीच संविधानिक मूल्ये रुजवत गुरुकुल इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षकांनी पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशन, पर्यावरण संरक्षण गतीविधी, सांगली यांच्या सोबतीने ई-कचऱ्याचे संकलन करत ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.



     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फूड इन्स्पेक्टर श्री अतुल आठवले, अंनिस शहर कार्याध्यक्षा श्रीमती आशा धनाले व अंनिस सदस्या त्रिशला शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव

     यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक मर्दानी खेळ, पिरॅमिड, ड्रामा इत्यादी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

पिरॅमिड सादरीकरण

लेझिम व ड्रामा सादरीकरण


     संविधान दिनाचे महत्त्व महत्व पटवून देण्याबरोबरच, प्रत्येक विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ असलेच पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजाला चुकीच्या दिशेने भरकटवणाऱ्या बुवा - बाबांच्या आहारी जाऊ नये व इतरांना जाऊ देऊ नये, असे सल्लापर मार्गदर्शन अंनिस कार्याध्यक्षा श्रीमती आशा धनाले यांनी विद्यार्थ्यांना केले.

अंनिस कार्याध्यक्षा श्रीमती आशा धनाले

    यावेळी संस्थेचे चेअरमन, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा