Breaking

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

*जयसिंगपूरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शिरोळ तहसील कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष जनजागृती रॅली संपन्न*


राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार प्रबोधन जनजागृती रॅली व शपथ 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : आज गुरुवार दिनांक २५ जानेवारी,२०२४ रोजी जयसिंगपूर शहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शिरोळ तहसील कार्यालय व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष जनजागृती रॅली संपन्न झाली.

     सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळ तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर यांचे आदेशाप्रमाणे शिरोळ तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुर त मांजरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,लोकशाहीचा खरा आधारस्तंभ मतदार असून त्यांनी संविधानाप्रमाणे प्राप्त झालेल्या मताचा अधिकार  विद्यार्थ्यांना लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी करावा. तसेच त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगितले. 

       यानंतर शिरोळ तहसील कार्यालयाच्या मतदार जनजागृती मोबाईल स्क्रीन कारच्या  माध्यमातून जयसिंगपूरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीचा मार्ग जयसिंगपूर कॉलेज ते क्रांती चौक असा होता. यावेळी मतदार जनजागृती व प्रबोधन करणाऱ्या घोषवाक्याने परिसर दणाणून सोडला.

     सदर रॅलीमध्ये सामाजिक चळवळीतील जागरूक नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.

    या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जयसिंगपूर कॉलेज एनएसएसच्या मतदार साक्षरता मंचच्या वतीने नोडल अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर डॉ. प्रभाकर माने,कॅम्पस अम्बॅसिडर भोलू शर्मा, प्रथमेश कोळी व एनएसएस प्रतिनिधी कु. समृद्धी येलाज यांनी केले होते. विशेष सहकार्य उपप्राचार्य डॉ.एन.पी.सावंत यांचे लाभले.

    यासाठी शिरोळ तहसील कार्यालय, मा.हंगे साहेब, श्री.गणेश व सचिन झेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा