![]() |
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे, मा.पद्माकर पाटील, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे,सुभाष वस्कर,अजित पाटील, आय.आर.पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ.अडदंडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील, संस्थेचे मान्यवर सदस्य व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे हे उपस्थित होते.
प्रारंभी एन.सी.सी.च्या वतीने उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनरचा सन्मान देत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगान झाले. यानंतर एन.सी.सी सीनियर लीडर कु.श्रुतिका शिंदे, एन. एस.एस. सीनियर लीडर कु. समृद्धी येलाज, स्काऊट गाईड लीडर श्री.श्रावण पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्याकडून मार्च पास करण्याची अनुमती घेतली. यावेळी एन.सी.सी., एन.एस.एस.व स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी उत्तम पथसंंचलन करून उपस्थितीच्या कडून वाहवाह मिळविला.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी एनसीसी कॅडेट्सना आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शपथ दिली.
यानंतर अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नयनरम्य अशा मनोराचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.बाळगोंडा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, प्र.कार्यालयीन अधीक्षक श्री.ए.बी.कांबळे व श्री. संजय चावरे यांनी केले.
अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षीप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत जिलेबी वाटप करण्यात आले. यासाठी चेअरमन प्रा.के.बी.पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. पी.सी.पाटील, सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आले. यासाठी विशेष सहकार्य मॅनेजर श्री.राहुल पाटील व सुधाकर पाटील यांच्याकडून मिळाले.
या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य अशोक शिरगुप्पे श्री.बाळासाहेब इंगळे, प्रा. आप्पासाहेब भगाटे,डॉ.शितल पाटील, डॉ.अनिल पाटील,डॉ. धवलकुमार पाटील, बिपीन खाडे,अभिजीत शिरगुप्पे, स्कूलचे सीईओ प्रा.अभिजीत अडदंडे , मुख्याध्यापिका सौ.प्रिया गारोळे मॅडम व सौ भावना मुचंडीकर मॅडम, कॉलेजचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी- सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा