Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

मा. अॅड. डॉ. सोनाली मगदूम, व्हाईस चेअरपर्सन, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन


एडवोकेट डॉ.सोनाली मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ. जे जे मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूर 


*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : मा. सोनालीताई या डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, राजश्री फाउंडेशन्स, शिशु विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सर्व शैक्षणिक संस्थांचे आय.एस.ओ. मानांकन NAAC, NBA ॲक्रीडीडेशन करून आभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मा. सोनालीताई यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेअंतर्गत डॉ. जे.जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप व शालेय मुलींसाठी महिला आरोग्यविषयी मार्गदर्शन व्याख्यान, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजकडून मोफत आरोग्य शिबिर व हळदीकुंकू कार्यक्रम, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ बी. फार्मसी व डी. फार्मसी कडून अपंग विद्यार्थी वस्तीगृहास फळ वाटप, नर्सिंग कॉलेज कडून रक्तदान शिबिर, अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेज कडून हर्बल गार्डन मध्ये वृक्षारोपण, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून मोफत आरोग्य शिबीर व वृक्षारोपण, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, दीप पब्लीक स्कूल, जयविजय विदयामंदिर यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

   तसेच विविध सामाजिक संस्थावरही त्या पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर राहून त्यांनी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अमेरिकेतील विद्यापीठाने डि.लीट. पदवीने गौरविले आहे. त्यांनी जयसिंगपूर नगरीच्या माजी नगरसेविका म्हणून अत्यंत कुशल कामकाज केले आहे. त्या राजकीय क्षेत्रातही सक्रीय असून त्या भाजपा पक्षाच्या हातकणंगले लोकसभा महिला मोर्चा संयोजिका, प्रदेश महिला सहप्रमुख, अल्पसंख्यांक मोर्चा (विधी) महाराष्ट्र राज्य, प्रदेश उपाध्यक्षा भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र राज्य, जिल्हा चिटणीस, कोल्हापूर ग्रामीण, प्रभारी, हातकणंगले विधानसभा यासह म्हणून कार्यरत आहेत.

   मा. अॅड. डॉ. सोनालीताई मगदूम यांचे पती डॉ. जे. जे. मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांचे त्यांना सतत प्रोत्साहन व पाठिंबा राहिला आहे. संस्थेअंतर्गत कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, इंजीनियरिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एस.बी. पाटील, अॅडवायझर, डॉ.यु.बी.देशन्नावर, नर्सिंगचे प्राचार्य डॉ. नदाफ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.एस.पाटील, आयुर्वेदिकचे प्राचार्य डॉ. बुद्रुक, पिंटू मगदूम कॉलेजचे प्राचार्य डॉ. निटवे, राजश्री फौन्डेशन्स, डायरेक्टर प्रा. रायन्नवार, होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बन्ने, जयप्रभाचे राहुल नवकुडकर यांनी व सर्व संस्था कर्मचाऱ्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सौ. सोनालीताई पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बाहेर असलेने त्यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छाचा स्विकार केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा