![]() |
आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने |
*प्रा. बाळगोंडा पाटील : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : आर्थिक साक्षरता हे एक महत्त्वाचे कौशल्य असून आर्थिक क्षमतेच्या सुधारण्यासाठी वित्तीय नियोजन, बजेट आणि बचतीचे परिपूर्ण ज्ञान शाळेतून शिकवले पाहिजे असे मत अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी जयसिंगपूर कॉलेजाच्या ज्युनियर कॉलेज विभागाने आयोजित केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत 'आर्थिक साक्षरता : यूपीआय चे महत्व' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.
प्रा.डॉ.माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असा उपक्रम सुरू करून एक प्रकारे रचनात्मक व अभिनव उपक्रम राबविला आहे. आजच्या बदलता युगात डिजिटल व्यवहार वाढले असून अशावेळी विविध उद्योग- व्यवसायात गुंतवणूक करीत असताना कशा प्रकारची दक्षता घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने दाखवल्या जाणाऱ्या आर्थिक आमिषाला बळी न पडता एक प्रामाणिक व जबाबदार व्यक्ती म्हणून आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे याबाबत दक्ष केले. यूपीएच्या माध्यमातून होणारे व्यवहार हे जितके सहज,सुलभ व पारदर्शक आहेत तसेच ते धोकादायक ही आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने सदसद बुद्धी जागृत ठेवून आर्थिक व्यवहार हाताळले पाहिजेत. शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आर्थिक साक्षरतेची सहजगता विद्यार्थ्यांच्यात निर्माण करणे ही एक प्रकारे 'जागो विद्यार्थी जागो' या पद्धतीची आहे.
अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे म्हणाले, शासनाचा हा उपक्रम विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सुरू केला असल्याने तो विद्यार्थ्यांच्या हितार्थ आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच याचे उत्तम ज्ञान व माहिती संपादन करून जागृत झाले पाहिजे.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रा. बाळगोंडा पाटील यांनी करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता काळाची गरज कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. शितल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचालन प्रा.सौ.एस. व्ही. बस्तवाडे यांनी केले.
यावेळी अकरावी कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य प्रा. भारत आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे व अन्य प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा