Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

*बलशाही भारतासाठी व सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेतील निबंध,रांगोळी, युवा नाट्य व विविध लोककलेतील युवकांचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावर यांचे प्रतिपादन*


मतदार जाणीव जागृती निमित्त युवा नाट्य व लोकनृत्य स्पर्धेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावर, प्रांताधिकारी श्रीमती मोसमी चौगुले व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  जागतिक महासत्ता बनण्यासाठी भारतीय लोकशाहीचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी बलशाही भारतासाठी  व सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेतीत युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी शासनाच्या वतीने  निबंध,रांगोळी, युवा नाट्य व विविध लोककलेतील  युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याबाबतचं प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावर यांनी  उपविभागीय अधिकारी इचलकरंजी,उपविभाग इचलकरंजी आयोजित मतदान जाणीव - जागृती( SVEEP) अंतर्गत युवा नाटय / लोककला महोत्सव स्पर्धा- २०२४ मध्ये बोलत होते.

    जिल्हाधिकारी डॉ. रेखावार पुढे म्हणाले, निवडणुक प्रकिया पारदर्शक व्हावी, लोकांनी योग्य उमेदवार  निवडावा तसेच नागरिकाना स्वतःचे अधिकार व जबाबदाराची जाणीव होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कौशल्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. हे सर्व लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा वापरली जात आहे.

     शासनाच्या (SVEEP) अंतर्गत मतदार जाणीवजागृती स्पर्धेचे खालील विषय अंतर्भूत होते.

१. मतदान हक्क आणि कर्तव्ये

२. युवकाचे लोकशाहीतील पहिले पाऊल- मतदान

३. लोकशाही बळकटीकरण व युवकांची भुमिका

४. भारतीय लोकशाहीचे भवितव्य युवकांच्या हाती.

५. मतदाराची मतदानाप्रतीची नैतिकता.

६. मतदार राजा जागा हो.

७. माझे मत - माझा हक्क

८. मतदान - वैचारिक स्वातंत्रय..

९. माझे पहिले मतदान.

१०. भारत माझा देश आहे.

        या विषयावर स्पर्धक विद्यार्थ्यांनी नाट्य व लोकनृत्याचे उत्तम सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांचं मन प्रफुल्लित केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी. मा.राहुल रेखावर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

      उप विभागीय अधिकारी तथा निडणुक निर्णय अधिकारी, कोल्हापूर मा.श्रीमती मोसमी चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून उत्तम कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

      ३० जानेवारी या महात्मा गांधीजीच्या हुतात्मा दिना निमित्त दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

     या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन उपविभागीय अधिकारी इचलकरंजी व उपविभाग इचलकरंजी यांचे वतीने प्रांताधिकारी मा.श्रीमती मोसमी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली  श्रो. समाधान शेंडगे,(उप जिल्हा निवडणूक. अधिकारी), डॉ.रोहिणी सोळंके(उपविभागीय पोलीस अधिकारी), श्रीमती कल्पना ढवळे (हातकणंगले तहसिलदार)श्री. अनिलकुमार हेळकर(शिरोळ तहसिलदार), श्री. मनोजकुमार  ऐतवडे (अप्पर तहसिलदार, इचलकरंजी) व श्रीमती टिना गवळी,(मुख्याधिकारी, जयसिंगपूर) व सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी केले.

     या कार्यक्रमास इचलकरंजी,शिरोळ व हातकणंगले मधील सर्व कॉलेज,शाळेतील प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा