![]() |
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी-जयसिंगपूर स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज आणि अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे व्याख्यानमाला |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर परिसराला नवी सांस्कृतिक झळाळी देण्यासाठी... यंदाच्या हीरक महोत्सवी वर्षापासून एक नवा कोरा उपक्रम अर्थात डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमाला राबविण्यात येत आहे. दोन्हीही व्याख्याने अत्यंत श्रवणीय, अभ्यासपूर्ण आणि सद्यस्थितीचे वास्तव दर्शन घडविणारे आहेत.
दोन दिवस.... दोन नामवंत वक्ते दिनांक २० व २१ जानेवारी २०२४ रोजी
१) शनिवार दि. २० जानेवारी २०२४-रोजी मा. संजय सोनवणी विचारवंत, इतिहास अभ्यासक हे असून "लोकशाही : भविष्यातील आव्हाने" या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.
२) रविवार दि. २१ जानेवारी २०२४- मा. संजय आवटे नामवंत पत्रकार, वक्ते असून "सद्य:स्थिती आणि नागरिकांपुढील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
अशी दोन्ही वैचारिक प्रगल्भतेची दर्शन घडवणारी व्याख्याने रसिक, जाणकार आणि जागृत श्रोत्यांसाठी वैचारिक मेजवानी आहे यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. याबाबतची माहिती जयसिंगपूर कॉलेज, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे(सर्व अक्कोळे कुटुंबीय) यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर दिली.
या पत्रकार परिषदेस कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ. राजेंद्र कुंभार,(प्रमुख व्याख्याता निवड समिती जयसिंगपूर), डॉ.अजित बिरनाळे व पत्रकार बंधू उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुभाष अक्कोळे यांचा थोडक्यात जीवन परिचय :- (१ एप्रिल १९२७ ते १९ जानेवारी २०११) त्यांच्या काळात जयसिंगपूर शहराचे भूषण आणि वैभव असणारा चतुरस्त्र व्यक्तिमत्व, प्राचार्य ,प्रशासक,उत्तम वक्ता, पत्रकार, शिक्षक, साहित्यक, संशोधक, संत साहित्याचे आणि जैन तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, पुरोगामी विचारांचा विवेकी विचारवंत अशी समाजापुढे आलेली त्याची विविध रूपे जयसिंगपूर वासियांसाठी नेहमीच अभिमान वाटणारी होती. एक निर्मळ मनाचा सुहृदय आणि अजात शत्रू म्हणून त्या अवघ्या जयसिंगपूरला परिचित होते. त्याची प्रेरणादायी स्मृती अखंड ताजी रहावी यासाठी ही व्याख्यानमाला अर्थात ही वैचारिक मेजवानी दरवर्षी..
या व्याख्यानमालाचे स्वागतोत्सुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सर्व सदस्य, स्थानिक समिती जयसिंगपूर आणि अनेकांत एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,डॉ. राजेंद्र कुंभार व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा