Breaking

बुधवार, १० जानेवारी, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये लैंगिक छळ प्रतिबंध, राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न*


रक्तदान शिबिर 


*प्रा.सौ.विश्रांती माने : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये सोमवार दिनांक ७ जानेवारी,२०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे होते. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

  राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी.व प्रकाश बापू पाटील ब्लड बँक, सांगलीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाविषयीची बांधिलकी दर्शविली. त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.

     या शिबिरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यासमोर एक आदर्श ठेवला.

       या शिबिरास संस्थेचे सदस्य प्रा.आप्पासाहेब भगाटे, प्रा.अभिजीत अडदंडे, बिपिन खाडे, नगरसेवक शैलेश चौगुले यांनी उपस्थिती दर्शवली.

  या शिबिराचे आयोजन लैंगिक छळ प्रतिबंध समिती प्रमुख डॉ.सौ.एस.एस.महाजन, एन. एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने,डॉ. खंडेराव खळदकर, एन. सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा.सुशांत पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा