Breaking

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

*पोलीस ठाणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रमुख केंद्र : पोलीस निरीक्षक मा.दिलीप घुगरे यांचे प्रतिपादन*

 

रेझिंग डे निमित्त मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दिलीप घुगरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून जयसिंगपूर पोलीस ठाणेस भेट देण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दिलीप घुगरे म्हणाले पोलीस ठाणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे केंद्र असून जनतेनेही सहकार्य करणे आवश्यक आहे. पोलीस हा जनतेचा मित्र असून लोकांनी पोलीस दला विषयी गैरसमज नसावा.

       पुढे मार्गदर्शन करताना श्री. घुगरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात रेझिंग डे निमित्त राज्यातील सर्व घटकांना पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धती विषयी  व दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने चालते याची प्राथमिक माहिती होण्याकरिता जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती देण्याची व्यवस्था केलेली असते. ते पुढे म्हणाले, भारताचे संविधान हा भारताचा लोकशाहीचा आत्मा असून सक्षम लोकशाहीसाठी पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची आहे. पोलीस दल हे नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून लोकांचं संरक्षण करीत असते. ठाणे अंमलदार श्री. चव्हाण यांनी पोलीस ठाणेच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली. पोलीस हवालदार श्री. बन्ने यांनी पोलीस ठाण्यातील शस्त्रास्त्रे दाखवून त्या संदर्भात मार्गदर्शन केले.


       याप्रसंगी ठाणे अंमलदार कक्ष, बारनिशी विभाग, गोपनीय विभाग, दूर संदेशवहन कक्ष, शस्त्रास्त्रे विभाग व लॉक अप सदर विभाग दाखविण्यात आले.विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस घटकांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

      यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ.खंडेराव खळदकर, घोडावत कन्या महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. गौतम ढाले व प्रा. परशुराम माने यांनी भेट दिली.सदर भेटीस जयसिंगपूर कॉलेज व घोडावत कन्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.तानाजी चौगले ,जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व घोडावत कन्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक यांचा विशेष मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा