![]() |
प्लॅस्टिक संकलन करताना एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्याकडून नववर्षाचे स्वागत कॉलेज परिसरातील प्लॅस्टिक संकलन करून अनोख्या पद्धतीने केले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.तानाजी चौगले व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने अर्थात प्लॅस्टिक मुक्त परिसर या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
एन.एस.एस विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादाद्वारे जवळपास ६७ किलो प्लॅस्टिक संकलित करण्यात आले. नूतन वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्याचा निश्चय केला.
या कार्यक्रमाचे आयोजन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, एनएसएस प्रतिनिधी कु. समृद्धी येलाज, भोलू शर्मा, प्रथमेश कोळी व ऋतुजा सावंत यांनी केले.या उपक्रमात असंख्य स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा