Breaking

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

*प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन*

 

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  २०२४ हे वर्ष जयसिंगपूर कॉलेजचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने, त्याचे औचित्य साधून कॉलेज व अक्कोळे कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसांची 'डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृतीव्याख्यानमाला' आयोजित करण्यात येणार आहे. जैन तत्वज्ञानाचे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक व आणि ख्यातकीर्त वक्ता असलेले कॉलेजचे माजी प्राचार्य स्वर्गीय डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांचा १९ जानेवारी हा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने दरवर्षी सलग दोन दिवस दोन नामवंत वक्त्यांची भाषणे ऐकण्याची संधी जयसिंगपूर-शिरोळ परिसरातील रसिक, जिज्ञासू व श्रोत्यांना मिळणार आहे.

   कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, वक्ता निवड समितीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ.अजित बिरनाळे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. महावीर अक्कोळे यांनी ही माहिती देताना असेही सांगितले की, स्मृतीव्याख्यानमालेचे वक्ते, विषय व तारखा लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतील.

    १०  तारखेनंतर पत्रकार परिषद घेणार आहोत त्यावेळी सविस्तर माहिती देणार असलेबाबतची माहिती जयसिंगपूर चे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे यांनी पत्रकारद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा