![]() |
आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करताना जयसिंगपूर कॉलेजचे डॉ. प्रभाकर माने व मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी सर |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर. : जीवन शिक्षण विद्यामंदिर धरणगुत्ती येथे आर्थिक साक्षरता : युपीआयचा वापर व सुरक्षितता या विषयावर जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी सर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यानाचा उपक्रम राबविण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने म्हणाले, देशातील प्रत्येक घटक हा आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे. काळानुरूप वित्तीय क्षेत्रातील होत जाणाऱ्या बदलामुळे आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. मात्र प्राप्त परिस्थितीनुसार डिजिटल युगात प्रत्यक्ष व ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी राज्यातील प्रत्येक विद्यार्थी हा बाल्या अवस्थेपासून आर्थिक साक्षर झाला पाहिजे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आळा बसेल. मुळात या जगात कोणताही व्यक्ती एक कवडी देखील फुकट देत नाही अशावेळी विविध प्रलोभनाच्या माध्यमातून जनतेची यूपीआय च्या माध्यमातून फसवणूक करून मोठी लूट केली जाते अशावेळी नागरिकांनी दक्ष राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे.
अध्यक्षीय स्थानावर बोलताना मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी सर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सजग करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचे व प्रत्यक्ष व्यवहाराची सुव्यवस्थित माहिती झाली पाहिजे यासाठी राबवलेला हा एक सुंदर उपक्रम आहे.
या कार्यक्रमास सौ. कोठावळे मॅडम, श्री. सरवदे सर व एन.एस.एस. प्रतिनिधी भोलू शर्मा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात विद्यार्थी व व्याख्याते यांच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सुसंवाद साधण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा