![]() |
जयसिंगपूर कॉलेजमध्ये आचार्य रत्न श्री देशभूषण मुनिराज स्मृती व्याख्यानमाला |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ११.०० वाजता आचार्य रत्न श्री देशभूषण मुनिराज स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.प्रा.बाळासाहेब भगरे (प्राध्यापक, प्राकृत साहित्य, शिवाजी कॉलेज सातारा) हे "प्राकृत कथा साहित्याची लोक उपयोगिता" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणी आशीर्वचन लाभले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री पद्माकर पाटील (खजिनदार, लोकल व्यवस्थापन समिती, जयसिंगपूर) हे आहेत. या व्याख्यानमालाचे प्रवर्तक प्रो.डॉ. जयकुमार उपाध्ये (पूर्व निर्देशक, बाहुबली प्राकृतिक विद्यापीठ, श्रवणबेळगोळ,कर्नाटक) हे आहेत. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्रा.डॉ. विजय ककडे (समन्वयक,महावीर अध्यासन केंद्र,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित राहणार असल्याबाबतची माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी दिली.
तरी जास्तीत जास्त नागरिक बंधू-भगिनींनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा