Breaking

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

*अब्दुललाटचा युवक मानस महावीर बिंदगेने सायकल प्रवासाद्वारे गाठले प्रभू श्रीरामाची अयोध्या*



अब्दुललाटच्या मानस बिंदगे या युवकांने गाठले अयोध्या नगरी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


शिरोळ : अब्दुललाट येथील मानस महावीर बिंदगे हा युवक १७ दिवसांत २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमी अर्थात अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी दाखल झाला आहे.

     मानस महावीर बिंदगे (वय वर्ष २२) याने जिद्दीने जयसिंगपूर ता.शिरोळ येथून प्रवासाला सुरुवात केली. प्रभू श्रीरामावर निस्सीम भक्ती असल्याने त्याने एकट्यानेच हा प्रवास पूर्ण केला. यामध्ये जयसिंगपूरपासून सांगोला, तुळजापूर, नांदेड, नागपूर, रामटेक, जबलपूर, कटनी, महर, राबा, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर असा  २००० किलोमीटरहून अधिक सायकल प्रवास त्याने केला.

  त्याच्या या दीर्घ प्रवासात महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथील नागरिकांनी राहण्याची व जेवणाची सोय करून सहकार्य केले. अनेक ठिकाणी जय श्रीरामाच्या घोषणांमध्ये त्याचे स्वागत झाले.

    मुळात मानस बिंदगे या युवकाची परिस्थिती अत्यंत बेताची असली तरी तरी देशप्रेम, देश अभिमान व राष्ट्र चेतना याने तो प्रेरित होता. कुटुंबियांनी दिलेली नैतिकतेची साथ व जयसिंगपूर येथील श्री मोबाईल शॉपीचे मालक श्री.किरण कुमार पाटील यांनी सहकार्य केले. जयश्रीराम अयोध्या हे धार्मिक ठिकाणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून  तो गेली दोन महिने सायकल प्रवासाचा सराव करीत होता यामुळे त्याचा हा प्रवास सुखकारक ठरला.

    दरम्यान, मानस आता पुढच्या प्रवासासाठी सायकलने नेपाळला जाणार आहे. सर्वांचा आशीर्वाद व कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे व प्रेरणेमुळे हा धाडसी प्रवास पूर्ण केल्याचे मानसने फोनवरून बोलताना सांगितले.

      मानस बिंदगे या युवकाच्या उदात्त भावना व जय श्रीराम बद्दलचे असणारी अटल श्रद्धा याकामी त्यांनी  केलेला २००० कि.मी.इतका लांबचा प्रवास यासाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा