![]() |
पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.एन.पी.सावंत, संपादक राजू सय्यद, पत्रकार बसुगडे सर, पत्रकार शरद वाघवेकर, पत्रकार रोहित जाधव, पत्रकार विवेक कांबळे, पत्रकार इनामदार व अन्य मान्यवर |
*प्रथमेश कोळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
६ जानेवारी,२०२४ रोजी जयसिंगपुरातील क्रांती चौकात जयसिंगपूर नगरी न्युज नेटवर्कचे संपादक मा. राजू उर्फ मेहबूब मुजावर यांनी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी पत्रकार दिन वैचारिक मंथनाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी प्रारंभी शुभेच्छा देऊन बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन परिचय व विशेष योगदानाबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर घटक व विद्यार्थ्यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जयसिंगपूरातील सर्व पत्रकार बंधू व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा