![]() |
श्री क्षेत्र रामलिंग आळते येथे प्लॅस्टिक संकलन करताना एन.एस.एस विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या च्या वतीने श्री क्षेत्र रामलिंग आळते येथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक संकलन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ व राष्ट्रीय सेवा योजनेचे आयकॉन स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक १३ जानेवारी, २०२४ रोजी मा. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने व डॉ. खंडेराव खळदकर यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र रामलिंग आळते (ता.हातकणंगले) येथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. यावेळी प्लॅस्टिक बाटल्या व इतर कचरा वेगळा करून साधारणपणे एक ट्रॉली इतका कचरा गोळा करण्यात आला. यावेळी आळतेचे सरपंच श्री.अजिंक्य अरुणराव इंगवले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा मनस्वी कौतुक करून त्यांनी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपसरपंच अमित पाटील, उत्तम मजलेकर व गुंडू (दादा)शिवराई उपस्थिती होते.
याप्रसंगी भोलू शर्मा, एन.एस.एस. प्रतिनिधी कु.समृद्धी येलाज, प्रथमेश कोळी, कु.ऋतुजा सावंत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा