![]() |
प्रा.असलम फरास यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करताना डॉ.मेघनाताई कोरे, संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पदाधिकारी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : प्रा.असलम फरास यांनी 35 वर्षे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या अध्यापना सोबत गेली दहा वर्षे संस्थेच्या सचिव पदाची धुरा ही यशस्वीपणे सांभाळली. शैक्षणिक कार्याबरोबरच राजकीय आणि सामाजिक काम देखील मोठे आहे. सलग चार वेळा जयसिंगपूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदापर्यत मजल मारली आहे. यापुढील काळातही त्यांनी समाजासाठी कार्यरत राहावे असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मेघनाताई कोरे यांनी केले.सांगली येथील यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमां कडील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे प्रा.असलम सिकंदर फरास सेवेचा गौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षा कोरे बोलत होत्या.
याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी प्रा.फरास यांना शुभसंदेश दिला.स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय शितोळे यांनी केले.
जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर शहरातील एक हरहुन्नरी नेता,निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणजे अस्लम फरास आहेत. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचे योगदान शिरोळ तालुक्यात आहे. आत यापुढे पुर्णवेळ त्यांनी जनतेसाठी वेळ द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव पवार, सांगली जिल्हा मध्यवर्तीचे माजी अध्यक्ष सिकंदर जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारांना उत्तर देताना प्रा.असलम फरास म्हणाले, आई-वडीलांच्या प्रेरणेमुळेच मला आज आपल्यासमोर येवून सेवा देता आली आहे. शिक्षणसेवा देत असताना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मला देता आले. विद्यार्थ्यांकडून मलाही काही शिकता आले. संस्थेने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडीत आहे. त्याचबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक जीवनात यापुढे वाटचाल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक सुभाष कदम, गजानन शिंदे, शरद आपटे, पी. व्ही.पाटील, पृथा एडवनकर, सुजाता तांबट, सहसचिव सुनील वसगडे, माजी संचालक संपत पाटील, हर्षदा पाटील अॅड.भगतसिंग रजपूत, बी.एस.कुलकर्णी, जामाँ मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सिकंदर गैबान, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, संभाजी मोरे, मिलिंद साखरपे, चांद तारा बैतूल माल कमिटीचे अध्यक्ष जुबेर शेख दस्तगीर नंदगावे एडवोकेट बीसी फरास पिंटू खामकर, रुस्तुम मुजावर शकील गैबान,राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र झेले, राजेंद्र आडके, महेश कलगुटगी अशोक मळगे यांच्यासह सर्व विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक सुभाष कांबळे यांनी मानले. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा