Breaking

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

*लोकशाही, समतावादी व मानवतावादी विचार सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून प्रस्थापित होतात : प्रा.डॉ. चंद्रकांत खंडागळे*


मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजतज्ञ प्रा.डॉ. चंद्रकांत खंडागळे, अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, प्रमुख,प्रा.डॉ.के.डी.खळदकर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : प्रत्येक व्यक्तीला सामाजिक समता व प्रतिष्ठा त्याचबरोबर लोकशाही, समतावादी व मानवतावादी विचार सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून प्रस्थापित होत असतात असे मत ज्येष्ठ समाजतज्ञ प्रा.डॉ. चंद्रकांत खंडागळे यांनी जयसिंगपूर कॉलेजच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने "सामाजिक शास्त्र व मानवी मूल्ये" या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रतिपादित केले.

     प्रा.डॉ. खंडागळे मार्गदर्शन करताना म्हणाले, मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करून त्यातून निर्माण झालेल्या असंख्य विषयांना जोडणारी मनुष्य केंद्रित शाखा म्हणजे सामाजिक शास्त्र होय. मुळात सामाजिक परिवर्तनाची ज्ञान शाखा म्हणून सामाजिक शास्त्राचा विचार केला जातो. यासाठी डॉ.खंडागळे यांनी डॉ.आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाबाबत व दुसऱ्या महायुद्धातील परिणामाच्या अनुषंगाने केलेला अभ्यास हा सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून प्रतीत होतो. मानवी विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी सामाजिक शास्त्रे महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. म्हणून सामाजिक शास्त्रांचा मानवी मूल्यावर दोन्ही पातळीवर परिणाम होत असतात.

      अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ.नितीश सावंत म्हणाले, भारतामध्ये विविध जाती, धर्म, वर्ण व लिंग त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक व भौगोलिक विषमता असताना देखील धर्मनिरपेक्ष पद्धतीने व एकोप्याने राहणे हे देखील सामाजिक शास्त्राच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे.

      सामाजिक शास्त्र प्रमुख डॉ. खंडेराव खळदकर यांनी कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून सामाजिक शास्त्र व मानवी मूल्ये यांच्यातील असणारे सहसंबंध विद्यार्थ्यांना माहित व्हावा याबाबतचा हेतू स्पष्ट केला.

      पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांनी केला.आभार डॉ. प्रभाकर माने यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. सुरज चौगुले यांनी केले.

     या कार्यक्रमास सामाजिक शास्त्र मंडळातील प्रा.डॉ.सौ. सुपर्णा संसुद्धी , प्रा.कविता चानकने, प्रा.माधुरी कोळी,प्रा. वर्षा चौगुले, प्रा.एम.एस. बागवान, प्रा. आर.के.कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा