![]() |
कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. बाळगोंडा पाटील, कु. तन्मय कोळी व कु. गौरव पाटील |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्तरीय आयोजित 'अटल कौशल्य विज्ञान प्रदर्शनामध्ये' जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर च्या ज्युनिअर विभागाला सर्वात नवोपक्रमशील प्रोजेक्ट म्हणून Farmer's Digital Diary' या प्रोजेक्टने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते झाले.
प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर च्या प्रांगणात Lend a Hand India व the डेस्सल्ट यांचे संयुक्त विद्यामाने अटल टिंकरिंग कौशल्य प्रदर्शनामध्ये एकूण ८१ शाळेनी सहभाग नोंदवला होता. या नवोपक्रमशील प्रोजेक्ट मध्ये रोबोट, अंधासाठी टोपी, ट्रॅफिक सिग्नल मॉडेल, आधुनिक मशागतीचे यंत्रे, विविध मोबाईल ॲप्लिकेशन अशा अनेक मॉड्युलचा समावेश होता. प्रारंभी तालुका स्तरावर सात ठिकाणी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण २८९ मॉडेलचा समावेश होता.त्यापैकी ८१ मॉडेलचा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जयसिंगपूर कॉलेज ज्युनियर विभागाच्यावतीने Farmer's Digital Diary' हे मोबाईल ॲप्लिकेशन सादर केलेले होते. सदर प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यात Digital Literacy मधून सर्वात नवोपक्रमशील प्रोजेक्ट म्हणून Farmer's Digital Diary' या प्रोजेक्टला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर विभागाचे अटल टिंकरिंगचे प्रमुख प्रा. बाळगोंडा पाटील, विद्यार्थी कु.तन्मय रवींद्र कोळी व कु.गौरव आनंदा पाटील यांच्या संघाने हा बहुमान खेचून आणला.
या करीता संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील, सर्व संचालक,उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे,प्रा.अनंत धुळासावंत, प्रा.शितल पाटील, प्रा.सौ. व्ही.जे.पाटील व इतर सर्व सहकारी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
या प्रदर्शनाचे पंच म्हणून नामवंत उद्योजक व शिवाजी विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.
जयसिंगपूर कॉलेज ज्युनियर विभागाने मिळवलेल्या या सुयशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा