![]() |
पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ पोलीस ठाण्याची धडक कारवाई |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : गेल्या तीन महिन्यापासून शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटरसायकलीचा छडा लावून मोटरसायकली चोरट्यास अटक करून मोठी कारवाई शिरोळ पोलिसांनी केली आहे.शिरोळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा. शिवाजी गायकवाड यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली हे यश प्राप्त झाले आहे.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरोळ पोलीस ठाणे कडे दिनांक ३१/१०/२०२३ रोजी नांदणी येथे राहणारे शरद बाळासो शंभुशेटे यांचे मालकीची बजाज बॉक्सर मोटारसायल MH०९- U ५८२८ ही अज्ञात चोरट्याने रात्री १ ते ४ च्या दरम्यान चोरून नेल्याने शिरोळ पोलीस ठाणे गु.र.नं २८२/२०२३ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
मागील तीन महिन्यात शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल असलेने सदर गुन्हे तातडीने उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री, महेंद्र पंडीत यांनी सुचना दिलेल्या होत्या.
तदनुसार शिरोळ पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपणीय माहीती मिळवुन संशयित आरोपी यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी करुन त्यांचेकडुन चोरीच्या ६ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
मा.उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी एम. गायकवाड यांचे नेतृत्वाखाली, पोलीस उप-निरीक्षक आय. बी. मुल्ला, पो.हे.काँ. १०११ बाबा पटेल, सहा. फौ. पुजारी, पो.हे.काँ. ६११ मडीवाल, म. पो. हे.काँ. १५६७ खंडागळे, पोना २१९८ परब, पो.काँ. ४९९ शेख, पो. काँ. २५२२ राठोड, पो. काँ. १७६० कोळी म.पो.काँ. २३४६ कदम, पो.काँ. १६७६ पटेल यांनी ही कामगिरी पार पाडली.
१)सदर गुन्ह्यात आरोपी किशोर उर्फ दादासो बाळासो कांबळे वय १९ वर्षे रा. बौध्द समाज मंदिर जवळ नांदणी ता. शिरोळ. २) संकल्प शशीकांत हवालदार व.व. १९ रा. बौध्द समाज मंदिर जवळ नांदणी ता. शिरोळ, ३) तम्मा बसवराज परशराम देगनाळकर व.व. २५ रा. बिरोबा मंदीर जवळ उदगाव ता. शिरोळ. ४) विधीसंघर्षग्रस्त बालक - ०३ असे नोंद झालेल्या गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली आहेत.
शिरोळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली सदरची कामगिरी उत्तम असल्याबाबतची चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा