![]() |
प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर किरण पाटील यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना स्वतः डॉक्टर किरण पाटील,डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे व सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. किरण पाटील यांनी वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
डॉ.पाटील यांनी ५४ व्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये क्रीडांगण जवळ विविध औषधीय व जंगली जातींच्या ५४ वृक्षांचे रोपण करून एक आदर्शवत डॉक्टर व नागरिक म्हणून कार्य केले. याप्रसंगी डॉ. किरण पाटील यांचा सत्कार जयसिंगपूर कॉलेजचे स्थानिक कमिटी चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आला व आरोग्य संपन्न आयुष्यासाठी वाढदिनी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे उपस्थित होते.
डॉ. किरण पाटील हे जयसिंगपूर शहर व पंचक्रोशीतील एक नामवंत, सामाजिक चळवळीतील अग्रेसर व संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचत आहेत. ते सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व आरोग्य विषयक उपक्रमात सक्रियपणे सहभागी होत असतात. जयसिंगपूर लायन्स क्लबचे अध्यक्ष असताना अनेक सामाजिक कामे पूर्णत्वास आणली.समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवडसा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते कार्यशील असतात. इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा जयसिंगपूरच्या माध्यमातून ते आपली वैद्यकीय सेवा निरपेक्ष पणे बजावीत असतात. मुळात डॉ.श्री. व सौ. पाटील हे डॉक्टर दाम्पत्य यांनी आपले जीवन हे सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर ठेवले आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये व्यावसायिक भूमिकेपेक्षा सामाजिक बांधिलकी जपणं हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटना व सामाजिक चळवळीतील आघाडीचे शिलेदार डॉ. महावीर अक्कोळे यांचे त्यांना मार्गदर्शन व सहकार्य असते.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने डाॅ राजेंद्र आलासे त्याचप्रमाणे डॉ. किरण पाटील यांच्यावर प्रेम करणारी त्यांचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते.यावेळी बीएसएनएलचे निवृत्त अधिकारी श्री महावीर टारे, रोटरी क्लब जयसिंगपूर चे माजी अध्यक्ष रुस्तमभाई मुजावर, जितेंद्र पाटील हरोलीकर, बी.ए.पाटील सर ,कदम सर, अण्णासाहेब पाटील हरोलीकर, शाम चिप्परगेसर, इंजि. लोहीकांत खोत, एडवोकेट राजेंद्र माने, तरुण उद्योजक संजय खामकर, अजित उपाध्ये सुभाष हातगिणे, नारायण डोंगरे, सतीश पाटील, सतीश झंवर, महेश धनवडे ,सीए जगन्नाथ कमतगी ,शोधन पाटील, कलगोंडा मोरे, प्रज्योत पाटील ,चंद्रकांत शिंदे, शिवाजी सावंत व कॉलेज वरील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मॉर्निंग वॉकिंग ग्रूप चे सदस्य व सर्व नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्वांचे आभार श्री महावीर टारे यांनी मांडले. या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा