Breaking

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

*देशाच्या विकासाचे व सामाजिक सेवाचे रथ पुढे नेणारी युवकांची फौज म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : संचालक प्रा.डॉ.तानाजी चौगले यांचे प्रतिपादन*

 

विशेष संस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना संचालक डॉ. तानाजी चौगले व अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्र. प्राचार्य प्रा.डॉ.मनीषा काळे, उपसरपंच मा.जाधव, सामाजिक संवेदनशील नेते शेखर पाटील व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी करणं हे खूप गरजेचा असून एन.एस.एस च्या विविध योजना व त्याचे व्यापक स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी देशाच्या विकासाचे व सामाजिक सेवाचे रथ पुढे नेणारी युवकांची फौज म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असल्याचा प्रतिपादन  शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक, प्रा.डॉ.तानाजी चौगले यांनी प्रतिपादन केले.मौजे धरणगुत्ती ता.शिरोळ येथे जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

.    प्रा.डॉ.चौगले पुढे म्हणाले, अशा शिबिराच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या नारारुपी आवाहनाचे तंतोतंत पालन राष्ट्रीय सेवा योजना करीत असते. याच माध्यमातून खेड्यातील सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक,राजकीय व सामाजिक अशा सर्व गोष्टींचे दर्शन होत असते म्हणून शिबिर हे ग्रामीण भागात आयोजित केले जात असतात. आज संपूर्ण देशात ४० लाख एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांची  फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे अनौपचारिक शिक्षण देणारी कृतीशील योजना म्हणजेच एनएसएस होय. इथून पुढे एनएसएसच्या माध्यमातून कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.या


      कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक मा. सरपंच शेखर पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, एन एस एस ही सामाजिक विकासाची मुख्य संघटना असून त्याच्या माध्यमातून ग्राम विकास साधता येतो. विद्यार्थ्यांनी हरित विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सेवा वृत्तीने काम केलं पाहिजे. यासाठी धरणगुत्ती गावाच्या विकासाबाबत माहिती दिली.

      अध्यक्षीय भाषण करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, मौजे धरणगुत्ती हे गाव महाराष्ट्रातील विकासाची उंची गाठणारे गाव बनले असून अनेक योजनेच्या माध्यमातून सामाजिक विकासाचे,पर्यावरण व संस्कृतीचे जतन करणारे गाव म्हणून सर्वत्र नामोल्लेख होत आहे. एन.एस. एस.शिबिराच्या माध्यमातून विविध आपत्तीच्या वेळी मदत करणारी एक कृतिशील संघटना असून विद्यार्थ्यांनी यामध्ये सेवाभावी वृत्तीने सहभागी व्हावे. या शिबिराचा उपयोग करिअर करण्यासाठी त्याचबरोबर 'मौजे धरणगुत्ती काल आणि आज' यावर शोधनिबंध लिहिण्याबाबतचे आवाहन केले. 

    प्र.प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.काळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना त्या म्हणाल्या,विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य करण्याचे संधी म्हणून या शिबिराकडे पहावे व उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात आमुलाग्र बदल करण्याची एनएसएस शिबिर ही एक नामी संधी आहे. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रभाकर माने यांनी केला.

       या उद्घाटन सोहळ्याचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर व उत्तम सूत्रसंचालन डॉ. सौ. सुजाता पाटील यांनी केले.

     संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे , संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, मा.पद्माकर पाटील व अन्य सदस्य , प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

  सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती विजया कांबळे, उपसरपंच विलास जाधव, ग्राम विकास अधिकारी श्री. चंद्रकांत केंबळे, आप्पासो पाटील, मनोहर माळी, शिवराज पवार,प्रा. कु.लंगरे मॅडम

     अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे धरणगुत्ती येथे बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी,२०२४ पासून ते १३ फेब्रुवारी,२०२४ पर्यंत संपन्न होत आहे.

      या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत भूमी,जल, अग्नी ,वायू व आकाश या पंचमहाभूते तत्त्वांचा विचार करून हे शिबिर भविष्यातील निसर्ग पूरक समाज घडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. त्यानिमित्ताने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा