![]() |
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात मार्गदर्शन करताना प्रा. अनिलकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, अध्यक्षस्थानी डॉ.सौ. सुनंदा शेळके, डॉ. संदीप तापकीर व डॉ. राजेंद्र कोळी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : साहित्य व कविता या माणसाला सातत्याने आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी आहेत.कारण साहित्य व कवीतेमध्ये निखळ भाव व सकारात्मक ऊर्जेचे अस्तित्व असते. खऱ्या अर्थाने कॉलेज जीवन हे आनंदी पर्व निर्माण करणारे सुंदर जीवन असते. या वयातील तरुणांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून सादर करणे खूप महत्त्वाचे असते.प्रेमाची खोली मोजण्यासाठी सर्वजण गर्क असतात कारण प्रेम भावना ही शुद्ध भावना असून त्यामधून सौंदर्यानुभूती येते असे विचार नवजीवन कॉलेजचे प्रा. अनिलकुमार पाटील यांनी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त जयसिंगपूर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात पुष्प गुंफताना मांडले.
प्रा.पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात प्रेममय भावना जपून ठेवल्या पाहिजे. या साऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या कविता च्या माध्यमातून सुंदररित्या मांडल्या. तसेच सरतेशेवटी त्यांनी 'प्रेम असेच घडतं' ही दीर्घ कविता सादर करून उपस्थित असणारे विद्यार्थी व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रसिद्ध कवियत्री प्रा.डॉ.सौ. सुनंदा शेळके म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात प्रेम फुलांच्या ओंजळी भरभरून घेतल्या पाहिजेत आणि सुंदर जीवन जगण्यासाठी प्रेम केलेच पाहिजे. यासाठी प्रेमामध्ये उदात्त भाव असणे गरजेचे आहे. सौ.शेळके यांनी देखील एक सुंदर कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एन.पी.सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात साहित्य व कविता बद्दल गोडी निर्माण व्हावी हा हेतू त्यांनी मांडला. डॉ.संदीप तापकीर यांनी सुंदररित्या आभार व्यक्त केले.तर डॉ.राजेंद्र कोळी यांनी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.
सदरचा विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम घेण्यास प्राचार्य डॉ.सुरज मांजरे यांनी प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा