Breaking

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

*कुरुंदवाड- नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर सांगलीच्या तरुणाचा खून ; पोलीस चक्रे गतिमान*

 

मयत विष्णू कदम,सांगली (वय वर्ष ३६)


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कुरुंदवाड : कुरुंदवाड- नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक 1012/1 यांच्या शेतलगत अनोळखी शिफ्ट मोटार गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष विष्णू कदम (वय वर्ष ३६, रा. गाव-भाग सांगली) या युवकाची धारदार चाकूने हत्या करून अज्ञात मारेकऱ्यांनी वाहन सोडून पलायन केले आहे.

    दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनांमध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट बूट आणि.संतोष कदम याचा झटापटीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला आहे.

    नांदणी-कुरुंदवाड हा रस्ता  रहदारीचा असल्याने तसेच शेतकरी आपल्या शेताकडे सकाळी जात असताना एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता. संतोष कदम याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला.त्याने लगेच कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधून सदरची माहिती दिली. 

     सदर माहितीद्वारे घटनास्थळी तात्काळ सपोनी रविराज फडणीस पोलीस फाट्यासह दाखल झाले. काही क्षणात उपाधीक्षक समीरसिंह साळवे, सांगली शहर पोलीस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्री गतिमान केली आहेत. 

     तथापि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वाहनातून दोन धारदार चाकू स्पोर्ट बूट जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल फुटलेल्या अवस्थेत मिळून आला असल्याने सदरची हत्याही होत असताना झटापट झाल्याचे सकृत दर्शनी दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा