Breaking

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

'चला अधिक रॅशनल होऊया' अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आकार फाउंडेशन, सांगली तर्फे रॅशनॅलिटी विषयावर एकदिवसीय विनाशुल्क कार्यशाळा.



प्रतिनिधी : सांगली येथे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखा आणि आकार फाउंडेशन यांच्या वतीने सांगलीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ प्रशिक्षक डॉ.प्रदीप पाटील यांची 'चला अधिक रॅशनल होऊया ' ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

      समाजातील माणसांचे दुःख कमी करण्यासाठी मानववादी दृष्टीकोनातून समाज घडला पाहीजे. प्रत्येकाने आपल्यातील विवेक ( रॅशनॅलिटी) वापरून सत्याचा शोध घेतला तर विज्ञानाइतकीच मानवी मूल्ये महत्वाची ठरतात. समाज दैववादी करण्यापेक्षा मानववादी करण्यासाठी प्रत्येकाने अधिक रॅशनल झाले पाहीजे. या भूमिकेतून हा विषय ठेवला आहे. अशी माहिती अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे यांनी दिली.

दिनांक - १८ फेब्रुवारी

वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५

स्थळ - श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, विश्रामबाग 

* भोजनाची आणि चहाची निशुल्क व्यवस्था केलेली आहे. 

* पूर्व नोंदणी अत्यावश्यक, नोंदणीची अखेरची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 

- नोंदणीसाठी संपर्क - 

१) आशा धनाले 9860453599, 

 २) डॉ. सविता अक्कोळे 9371401312 

      

ही कार्यशाळा सांगली येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.संजय निटवे यांच्या मातोश्री शामाबाई बाबुराव निटवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निटवे परिवाराकडून प्रायोजित केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा