Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीय सेवा योजना ही विवेकवादी व कृतिशील समाजाच्या निर्मितीसाठी सेवेच्या माध्यमातून कटिबद्ध : पोलीस निरीक्षक मा.शिवाजी गायकवाड यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, शेखर पाटील,प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : देशाचा विकास युवकांच्या हाती असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विवेकवादी व कृतिशील समाज  निर्मितीसाठी सेवेच्या माध्यमातून कटिबद्ध असले पाहिजे असे मत  शिरोळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा.शिवाजी गायकवाड यांनी मौजे धरणगुत्ती येथे सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारोप कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेखर पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    पोलीस निरीक्षक गायकवाड पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व एनएसएस आयकॉन स्वामी विवेकानंद यांच्या कृतिशील विचारांचा जागर प्रत्येक तरुणांनी केला पाहिजे. त्यांनी विद्यार्थी दशेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामाचा अनुभव सांगितला. विद्यार्थ्याने शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक संवेदना जोपासली पाहिजे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शेखर पाटील, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे अन्य मान्यवर 


       अध्यक्षीय भाषण करताना मा.शेखर पाटील म्हणाले, आज जगाला शाश्वत विकासाची आवश्यकता आहे. यासाठी जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. यासाठी मौजे धरणगुत्ती गाव हे माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणीय उपक्रम राबवित आहे. पंचमहाभूते तत्त्वांच्या  अर्थात भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश माध्यमातून पर्यावरण संतुलन ठेवणे काळाची गरज आहे. यासाठी एनएसएसचे विद्यार्थी महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहेत.

       ग्राम विकास अधिकारी मा.चंद्रकांत केंबळे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. धरणगुत्ती गावातील नागरिकाकडून माझी वसुंधरा अभियान ४.० या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने जवळपास १०,५६०  E-pledge प्रमाणपत्र ग्रामपंचायतीस सादर केले. तसेच त्यांनी नदीघाट स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, सार्वजनिक परिसर स्वच्छता, विविध रॅलीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत रचनात्मक कामे केले आहेत.

    प्रारंभिक उपस्थित मान्यवरांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले. प्रास्ताविकेच्या माध्यमातून ७ दिवसीय विशेष संस्कार शिबिरामध्ये एन.एस.एस च्या विद्यार्थिनी केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत पर्यावरणाशी संबंधित ५ व्याख्याने संपन्न झाली.

     पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रभाकर माने यांनी केला.तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी  मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन एनएसएस प्रतिनिधी कु. समृद्धी येलाज यांनी केले.

       हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक तानाजी चौगले, संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील,संस्थेचे सर्व पदाधिकारी, कॉलेजचे सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व कर्मचारी, मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायती चे सरपंच सौ. विजया कांबळे, उपसरपंच श्री. विलास जाधव,सर्व सदस्य व सागर हेरवाडे, प्रमोद कांबळे, लखन कुरणे व संदेश कांबळे यांचे सहकार्य लाभले.

    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य भोलू शर्मा, गणेश कुरले, विक्रांत माळी, मेहबूब मुजावर, अक्षय कोळी, गुलाब माळी, जीवन आवळे व गौरव भोसले यांचे लाभले.

      या शिबिरात उपप्राचार्य प्रा.डॉ.नितीश सावंत,प्रा.डॉ.सौ. सुपर्णा संसुद्धी, दादासो पाटील,पोलीस पाटील संभाजी भानुसे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर माळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा