Breaking

शुक्रवार, १ मार्च, २०२४

*आई वृध्दाश्रमाचा वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न ; विनोदभाऊ घोडावत यांचेकडून २५ हजार रूपयांची मदत*

 

विनोदभाई घोडावत आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांचा सत्कार करताना व अन्य मान्यवर 


*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर:  निमशिरगांव येथे स्वतः च्या जागेमध्ये आई वृध्दाश्रमाचे बांधकाम दानशूर लोकांच्या मदतीवर टप्याटप्याने सुरू होते. अखेर तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने आई वृध्दाश्रमाची इमारत उभी राहिली.‌ याचाच वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम दि. २५/२/२०२४ रोजी प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.

    सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती विनोदभाऊ घोडावत,  उद्घाटक - डॉ. सुकूमार मगदुम चेअरमन हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल काॅलेज, उद्योगपती विपीन बियाणी आणि बियाणी परिवार, चित्रपट अभिनेते आणि जेष्ठ पत्रकार दगडु माने यांच्या हस्ते संपन्न झाले.  तसेच आई वृध्दाश्रम संघर्षमय कार्याचा लेखाजोखा मांडणारा  आभाळमाया विशेषांकांचे प्रकाशन इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष - भगवंत जांभळे, डॉ.‌प्रसाद माने , डॉ रियाज अत्तार, डॉ.‌आशाताई गाडीवडर , राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे ख्रिश्चन महासेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - शशी कांबळे आणि कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवि भोरे हे लाभले.

           विपीन बियाणी आणि बियाणी परिवाराने स्वागत कमानीचे फित कापुन उद्घाटन केले. तर विनोदभाऊ घोडावत आणि डॉ, सुकूमार मगदुम यांनी सर्व वृध्दांना सोबत घेऊन फित कापुन गृहप्रवेश केला.  यावेळी सर्व मान्यवरांची भाषणे झाली.‌ सर्वांनी आई वृध्दाश्रमाच्या संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला. आणि सर्वांनीच अशा खडतर प्रवासात सुद्धा आई वृध्दाश्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून अनाथ , निराधार वृध्दांचे नाथ बनलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या परिवाराचे कौतुक केले. 

       प्रकाश रत्नाकर आणि त्यांच्या टिमच्या कलाकारांनी ऑर्केस्ट्रा स्वरगुंजनच्या माध्यमातून कराओके गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच ज्या ज्या दात्यांनी आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी मदत केली आहे. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चिपरीचे माजी सरपंच धनपाल कनवाडे सर यांनी आई वृध्दाश्रमास ५ हजार रूपयांची मदत केली. 

       राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.‌गंगाराम सातपुते सर आणि कला व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि सिनेअभिनेते  रावसाहेब भोसले यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुत्रसंचलन करून कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडला.

       यावेळी आई वृध्दाश्रम संचालक मंडळाचे उपाध्यक्ष परशुराम ऐवाळे , सचिव - रेश्मा भोसले, संचालिका - आनिता वाघमारे, हेमा भोसले, लक्ष्मी नायकवडी आणि संचालक सुरूप आदमाने उपस्थित होते.‌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा