Breaking

रविवार, ३ मार्च, २०२४

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ.एम.एस. देशमुख, शिव सहायता केंद्राचे प्रमुख डॉ.एस.एम. गायकवाड व एनएसएसचे संचालक डॉ. तानाजी चौगले व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिवसहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महादेव देशमुख लाभले होते. याप्रसंगी शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ.एस.एम. गायकवाड तसेच शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.टी.एम.चौगुले प्रमुख उपस्थित होते. 


   प्रारंभी कार्यक्रमाचे उद्‌घाटन मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते रोपास जलार्पण करून झाले. डॉ. देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले,संपूर्ण मानव जातीला निसर्गनिर्मित, मानवनिर्मित व अनिश्चित अशा संकटाना अर्थात आपत्तींना सामोरे जावे लागते आहे. अशावेळी आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्न सोडवणे आवश्यक असते. मनुष्याचे जीवन सुरक्षित व सुखर होणेसाठी  सर्व समस्यांचा स्वतंत्र अभ्यास व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेली व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. अशावेळी शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची एक स्वतंत्र आपत्ती फौज निर्माण होत आहे. मुळात सर्व अर्थानी उत्तमरीत्या प्रशिक्षित असणारी यंत्रणा-शासकीय, सांघिक, सामाजिक  व वैयक्तिक पातळीवरही असणे हे खूप महत्त्वाचे आहे, किंबहुना ही ,'काळाची गरज' असल्याबाबतचे मत याप्रसंगी डॉ. महादेव देशमुख यांनी व्यक्त केले.

    प्रथम सत्रात मा.श्री सत्यजीत देसाई (समुपदेशक,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी आपत्ती, आपत्तीचे प्रकार, आपत्ती पूर्व व्यवस्थापन या संज्ञांचे विस्तृत आढावा घेतला. आपत्तीची भीषणता व त्या प्रसंगी असणारी मानसिकता याबाबत मार्गदर्शन केले.

      द्वितीय सत्रात शिवाजी शिवाजी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन करीत त्यांनी CPR ची विस्तृत माहिती दिली व प्रात्याक्षिकही करून दाखवले. प्रथमोपचार देऊन CPR चे आपत्तीग्रस्त व्यक्तीला वाचवता येते हे सांगितले. विद्यापीठाच्या  मेडिकल इमर्जन्सी मध्ये कशा प्रकारची दक्षता घ्यायची याबाबत माहिती दिली.

    दुपारच्या सत्रात जीव रक्षक दिनकर कांबळे यांनी प्रात्यक्षिकांसह विविध आपत्ती बाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. शेवटच्या सत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील जवानांनी अग्निशमन बद्दल प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच फायरचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणारी विविध उपकरणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले आणि उपकरण बाबत माहिती दिली. त्याचबरोबर बचाव कार्य करत असताना घ्यायच्या काळजीबाबत ही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे आणलेला ब्लोअर आणि इतर वनवा विझविण्याच्या संशोधनाबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.


     सदर प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के, प्र- कुलगुरू प्रा.डॉ. पी.एस.पाटील व कुलसचिव प्रा.डॉ. विलास शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले.

       आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे व व प्रशिक्षणार्थींचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.टी.एम.चौगुले यांनी मानले.

        जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रशिक्षणार्थीं म्हणाले, प्रशिक्षणाअंती आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने याचं प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच हे या प्रशिक्षणामुळे सर्व प्रकारच्या आपत्तीला कसे सामोरे जावे व इतरांना कसे सहकार्य करावे याचे माहिती,ज्ञान व प्रशिक्षण मिळाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मविश्वास ,धाडस वृद्धिगत झाला आहे. त्यामुळे या प्रशिक्षणार्थीने शिबिर आयोजकांचे विशेष पद्धतीने ऋणनिर्देश व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा