![]() |
सदिच्छा समारंभात मार्गदर्शन करताना उप प्राचार्य डॉ.एन.पी.सावंत व अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर माने, प्रा. कु. माधुरी कोळी व प्रा.सौ. विश्रांती माने |
*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये बी.ए. भाग ३ अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. नितीश सावंत व अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर माने होते. प्रा. कु. माधुरी कोळी व प्रा.सौ. विश्रांती माने या उपस्थित होत्या.
उपप्राचार्य डॉ. नितीश सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सजग राहून भविष्यकाळाचा वेध घेत येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे गेले पाहिजे. आज अनेक आव्हाने आपल्यासमोर आवाचून उभे आहेत. आपल्याला विद्यार्थी दिशेत दिलेले ज्ञान,माहिती व संस्कार याचा वापर करून समाजात उभे राहिले पाहिजे. हीच ती वेळ आहे जिथे आपले कर्तुत्व पूर्ण व्यक्तिमत्व सिद्ध करता येते.
अध्यक्ष स्थानावर बोलताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने म्हणाले,जयसिंगपूर कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला दिलेले हे संस्कारक्षम विचार व ज्ञान पुढे घेऊन विकासाच्या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली असून विविध पैलूच्या अर्थात कौशल्य पूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून व्यावहारिक जगताला सामोरे जावयाचे आहे.
याप्रसंगी प्रा.सौ. विश्रांती माने व प्रा. कु.माधुरी कोळी यांनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी करिअर रुपी आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कु. सोनाली साळुंखे, कु. श्रीदेवी माने,कु. प्रतीक्षा सरवदे,कु. अंजली माळी, श्री. वेदांत शिंगे व भोलू शर्मा यांनी अर्थ व भावनापूर्ण मनोगते व्यक्त केली.
सुरुवातीस प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. नितीश सावंत यांच्या हस्ते रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कु. श्रीदेवी माने यांनी केले. आभार प्रदर्शन कु. गीता जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु. सोनाली साळुंखे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विभागास भारतीय व विदेशी अर्थशास्त्रज्ञांचे फोटो म्हणून भेट वस्तू प्रदान केले.
सदिच्छा समारंभ कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य मिळाले.
या कार्यक्रमास कु. सोनाली साळुंखे, कु. श्रीदेवी माने,कु. प्रतिक्षा सरवदे,कु. अंजली माळी, श्री. वेदांत शिंगे,भोलू शर्मा,मयुरेश माने, श्रेया संकपाळ, संस्कृती मगदूम, प्राजक्ता पोवार, गीतांजली जाधव, वैष्णवी पोवार, प्रियांका हडपद, स्वाती नलवडे, निखिल नंदीवाले, रोहित बंडगर, अनिकेत पाटील व कृष्णा दुधाळे हे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कु. सोनाली साळुंखे, कु. श्रीदेवी माने,कु. प्रतिक्षा सरवदे,कु. अंजली माळी.व भोलू शर्मा यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा