Breaking

रविवार, १० मार्च, २०२४

*जयसिंगपूरच्या लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी च्या वतीने मोफत तपासणी शिबिर संपन्न ; असंख्य नागरिकांनी घेतला लाभ*


लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी च्या वतीने मोफत मधुमेह तपासणी शिबिर, जयसिंगपूर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : पवित्र रमजान महिना व जागतिक महिला दिना निमित्त जयसिंगपुरातील प्रसिद्ध लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी च्या वतीने सर्व नागरिकांसाठी मोफत शुगर तपासणी शिबिरांतर्गत  रक्त तपासणी करण्यात आली.



    लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ.नीलम अत्तार यांचे कडून २०० लोकांची रक्त तपासणी करण्यात आली.या मध्ये काही लोकांना मधुमेहाचे निदान झाले असून त्यांना मधुमेहाबाबत आरोग्य विषयक  माहिती देण्यात आली.तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही महिलांचे आरोग्य तपासणी बरोबर मोफत HB तपासणी करण्यात आली. 

    तपासणी करून घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरीचे इन्चार्ज डॉ. नीलम अत्तार यांचे विशेष आभार मानले. याच बरोबर स्टाफ ने केलेल्या उत्तम सेवेबाबत कौतुक केले.

   मुळात जयसिंगपुरातील प्रसिद्ध तरुण धन्वंतरी व बालरोग तज्ञ डॉ. रियाज अत्तार व त्यांची पत्नी डॉ. नीलम अत्तार हे डॉक्टर दांपत्य नेहमीच गरीब व होतकरू रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चातील वैद्यकीय सेवा देण्याबाबत कटिबद्ध असते. त्याचाच भाग म्हणून आजच हे मोफत मधुमेह व महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.रुग्णांच्या हितार्थ त्यांची वैद्यकीय सेवा राहिली आहे. त्याचबरोबर ते सामाजिक संवेदनशील आहेत. त्यांच्या या शिबिराचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात सर्व धर्मीयांचे धर्मगुरू व पुजारी शिबिरात सहभागी झाले होते.या मध्ये हनुमान मंदिर चे आदरणीय श्री.गौरीशंकर शुक्ला जी महाराज ,आदरणीय श्री.रामशंकर शुक्ला जी महाराज, राम मंदीर चे आदरणीय श्री रामनरेश गर्ग महाराज, बौद्ध धर्मगुरू आदरणीय भन्ते डाॅ. यशकश्यपायन महाथेरो व हाफिज नाईकवडी यांनी सहभाग घेतला यातून धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा