![]() |
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन करताना प्रोफेसर डॉ. प्रकाश कांबळे व प्राचार्य डॉ.शानेदिवान,डॉ.मगदूम व कार्यक्रम समन्वयक डॉ.सौ.सुनीता राठोड व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : गुरुवार दि. ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी श्री शाहू छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र विभाग आयोजित ''भारतीय अर्थव्यवस्थेची ७५ वर्षे "यावर राष्ट्रीय चर्चासत्र सकल विचार मंथनाच्या माध्यमातून संपन्न झाले.
भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेसाठी संविधानातील अर्थव्यवस्था संबंधीच्या तरतुदींचा आधार घ्यावा. तसेच सामाजिक व आर्थिक विकासा संबंधीची धोरणे राबवावीत व त्याची उचित अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रोफेसर डॉ. प्रकाश कांबळे (डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ, सागर मध्यप्रदेश) हे चर्चासत्रात बीजभाषक म्हणून मत प्रतिपादित केले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण होते.
प्रारंभी वृक्षाला जल अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले.
बेळगाव येथील के. एल. ई. सोसायटीच्या अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विनोद मगदूम म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा ७५ वर्षातील प्रवास हा केवळ आर्थिक नसून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, तांत्रिक, वैज्ञानिक आणि इतर घटकांचा विकास यामध्ये आहे. हा विकास करताना शेती, उद्योग, सेवा इत्यादी क्षेत्रात निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी आणि दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी, वित्तीय तूट कमी करणे, आर्थिक विषमता कमी करणे, वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेले शेतीवरील अरिष्ट दूर करणे आणि विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी सूयेकचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अर्थतज्ञ होते प्रा.डॉ.सुभाष दगडे म्हणाले, भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राचा विकास, सहकारी क्षेत्राचा विकास , खाजगी क्षेत्राला मर्यादित प्राधान्य देऊन, सामाजिक, आर्थिक विषमता कमी करता येईल.शिवाजी कॉलेज सातारा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख व प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. अनिलकुमार वावरे यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक विकासाचा आढावा घेऊन भविष्यातील आव्हानांचा वेध घेतला.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी या चर्चासत्रा मागील भूमिका आणि महाविद्यालयाने राबवलेले विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली.
आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी महाविद्यालयातील वैविध्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
स्वागत अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता राठोड यांनी केले. डॉ. राज बिरजे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी.पी.गावडे यांनी आभार मानले.
कमला कॉलेजच्या प्राचार्य व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.सौ.तेजस्विनी मुडेकर, कोतोली कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, सुयेक चे अध्यक्ष डॉ.एम.जी.पाटील, डॉ.काशिनाथ तनंगे, डॉ संतोष यादव डॉ.एस.एस.ओमासे यांनी मनोगते व्यक्त केली.
राष्ट्रीय सेमिनारच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रमुख व ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.सौ. व्ही.पी.कट्टी यांनी विद्यमान भारतीय अर्थव्यवस्थेत संदर्भात वास्तव मांडणी केली.डॉ.कट्टी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ७० पेक्षा अधिक संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची ७५ वर्षे , संधी व आव्हाने या विषयावर संशोधन निबंध सादर केले. अर्थशास्त्र विभागातील डॉ.सारिका मोरे, प्रा.अर्जुन कांबळे यांनी चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या चर्चासत्रास प्रोत्साहन मिळाले.
विविध महाविद्यालयातील संशोधक, प्राध्यापक,विद्यार्थी, मोठ्या संख्येने या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय सेमिनारात सहभागी घटकांनी सेमिनार आयोजनाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा