Breaking

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

*जयसिंगपूरच्या कु.आदिती संजय चौगुले यांनी यूपीएससीच्या परीक्षेत ४३३ व्या रेंक ने मिळवले सुयश*



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील कु.आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. आदितीचे प्राथमिक शिक्षण मालू हायस्कूल, बारावी जनतारा शिक्षण संस्था जयसिंगपूर तर  सांगली वालचंद कॉलेज येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण होवून युपीएससी परीक्षेची तयारी तिने सुरु केली होती. 

  केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये तिने ४३३ वी रँक घेवून यश संपादन केले.पहिल्याच प्रयत्नात  तिने हे यश संपादन केले.

      तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा