Breaking

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

*जयसिंगपूर नगरपरिषद व जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने मतदान जनजागृती रॅली संपन्न*

 

जयसिंगपूर नगरपरिषद व जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती रॅली


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ स्वीप अंतर्गत  जयसिंगपूरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती होणे अनिवार्य आहे यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन जयसिंगपूर नगरपरिषद व जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने करण्यात आले होते. 


    अप्पर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मा.संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मोहिनी चव्हाण व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळ तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

      या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १) मतदान करण्याविषयी प्रबोधन करणारे हात फलक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते. यामध्ये मुलींचा सहभाग हा सक्रिय व अधिक होता. २) मतदान जनजागृती करणाऱ्या घोषणांनी सदरचा परिसर दणाणून सोडला होता. ३) सदर रॅली पाहण्यासाठी लोकांची संख्या प्रचंड होती.

    जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उप मुख्याधिकारी सौ.प्रमिला माने, नगरपरिषद अधिकारी  श्री. अनिरुद्ध महाजन, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. सुनील चौगुले, प्रा. महेश शिंगे ,प्रा. राजेंद्र कोरे, प्रा. अंजना चौगुले-चावरे, प्रा.एस.व्ही बस्तवाडे, प्रा. शीतल पाटील, प्रा. बाळासाहेब पाटील, अन्य प्राध्यापक, एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा