![]() |
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्नसुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख (मुळगाव समर्थनगर मोहोळ जि.सोलापूर) हिला आज लाच प्रकरणी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडली. या विभागाकडून सांगितले की, तिने हॉटेलच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी वरून कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये लाच घेतल्याचे स्पष्ट झाले.
मुळात अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला असल्याबाबत बोललं जात आहे. पोलिसांनी कीर्ती देशमुख हिच्या घराची झडती घेतली असता ८० तोळे सोने, रोख साडेतीन लाख रुपये व साडेतीन ते चार लाख रुपये किमतीच्या हिऱ्याचा हार जप्त करण्यात आला.
सदर कारवाईबाबत लाच लुचपत विभागाने दिलेली अधिकृत माहिती अशी की, फिर्यादीचे (किणी ता: हातकणंगले) येथे हॉटेल व्यवसाय आहे. संकेत कीर्ती देशमुख हिने १५ मार्च २०२४ ला या हॉटेलची तपासणी करत अन्नपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी घेतले. त्रुटी बाबत कारवाई न करण्यासाठी कीर्ती देशमुख यांनी फिर्यादीकडे एक लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार निश्चित करण्यात आले. त्यातील पहिला हप्ता २५ हजार घेताना तिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. याप्रकरणी देशमुख हिच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमती देशमुख हिची सात महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पथकाने कारवाईनंतर तिच्या मूळ गावी तिच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला पण तिचे घर बंद होते तिच्या आई अलीकडेच कोल्हापुरात राहण्यास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बंबरगेकर, भंडारे सुधीर पाटील पूनम पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कारवाईचे ठिकाण : कीर्ती देशमुख हिने धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकात पैसे स्वीकारले. तेथून ती तिच्या वाहनाने घराजवळ गेली तेथील पार्किंग मध्ये वाहन लावत असतानाच लाचलुचपत विभागाने तिला ताब्यात घेतले. विभागाला पैशावर मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री करून तिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा