![]() |
परिसंवादात मार्गदर्शन करताना संविधान अभ्यासाक डॉ. अजित बिरनाळे, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे व डॉ. तुषार घाटगे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सर्वांनी समान हक्कासाठी जागरूक असणे गरजेचे असून आपला मूलभूत अधिकार व हक्क जपण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यासाठी संघर्ष करणे गरजेचं आहे यासाठी संविधानाचा सर्वकष व परिपूर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे. तसेच देशात सामाजिक व आर्थिक समता आणण्यासाठी संविधानाची नितांत आवश्यकता आहे असे मत प्रसिद्ध धन्वंतरी व संविधानाचे अभ्यासक डॉ. अजित बिरनाळे यांनी प्रतिपादित केले.ते जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व माजी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार उपस्थित होते.
![]() |
मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व डॉ. महावीर अक्कोळे |
जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारताचे संविधान या विषयावर 'परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. बिरनाळे पुढे म्हणाले, भारतीय संविधान समजून घेत असताना यामागील पार्श्वभूमी व ऐतिहासिक बाजू समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी संविधान निर्मितीसाठी ची पार्श्वभूमी बारकाईने मांडली. तसेच १९४५ नंतर स्वातंत्र्याची चाहूल लागल्यानंतर राजकीय सत्तेचे स्थानांतरण कसे करावे हा यक्ष प्रश्न स्वातंत्र्यकर्त्यांसमोर होता अशावेळी संविधानाशिवाय तरणोपाय नाही हे सर्व घटकांच्या लक्षात आले. डॉ. बिरनाळे यांनी संविधानाचा वैचारिक गौरवशाली इतिहास मांडताना वर्ष निहाय झालेले बदल व घेतलेले निर्णय याची येथोचित मांडणी केली.
माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार मार्गदर्शन करताना म्हणाले, मुळात संविधानाचा जागर करणे सद्य परिस्थितीत गरजेचे आहे. संविधान म्हणजे कायद्याचा कायदा होय. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी मांडताना त्यांनी अनेक दाखले देऊन संविधानाची सक्षमता व सफलता स्पष्ट केली. डॉ.आंबेडकरांनी या देशातील महिलांना मतदान अधिकाराबरोबर सर्व प्रकारचे अधिकार प्रदान करून समानता निर्माण केली. संविधान सभेच्या माध्यमातून विविध बदलाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आणि खऱ्या अर्थाने राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक लोकशाही निर्माण होऊ लागली. यासाठी 'संविधान बचाव देश बचाव' हा नारारुपी विचार डोक्यात ठेवून सर्वांनी संविधान अंगीकारले पाहिजे.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, भारतीय संविधान हे क्रांतिकारी कायद्यांचा कायदा आहे. संविधान हे क्रांतिकारी विचाराचे व बदलाचे प्रयोग आहेत. जात व धर्म विरहीत व्यवस्था निर्माण करणारी व्यवस्था आहे. यापुढे देशाचा वैचारिक व भौतिक विकास हा म.फुले, छ.शाहू व डॉ.आंबेडकर यांच्या क्रांतिकारी इतिहास व वैचारिक प्रवाहमुळे पुढे घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी प्रतिपादले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. तुषार घाटगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. नितीश सावंत यांनी केला. कार्यक्रमाचे आभार डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. संदीप तापकीर यांनी केले.
या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा व सहकार्य मिळाले. याप्रसंगी माजी उपप्राचार्य प्रा. के.बी.पाटील, डॉ.सौ. बिरनाळे मॅडम, उपप्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, उपप्राचार्य डॉ.सौ. एम. व्ही.काळे, कॉलेजमधील सीनियर व ज्युनिअर मधील सर्व प्राध्यापक , प्रशासकीय सेवक - कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा