![]() |
जयसिंगपूरचे डॉ.जे.जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे जे मगदूम ट्रस्ट कडून, ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम यांचा वाढदिवस २२ एप्रिल,२०२४ रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. दर वर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये विशेष करून मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमांना फळे व धान्य वाटप इत्यादी रचनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून समाजभान राखीत उपक्रम राबविण्यात आले.
१९७२ साली कै.डॉ. जे. जे. मगदूम व त्यांच्या पत्नी कै. प्रभावती मगदूम यांनी डॉ. जे. जे. मगदूम यांच्या नावे एक शैक्षणिक संकुल उभा केले.२०१२ नतंर त्यांच्या पश्चात हे ट्रस्ट चांगले व गुणवत्ता पूर्ण चालवण्यासाठी डॉ. विजय मगदूम व त्यांच्या पत्नी डॉ.सोनाली मगदूम अहोरात्र कष्ट घेत आहेत. ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्था नॅक मानांकित करणे, आय. एस. ओ.सर्टिफाईड करणे व अभियांत्रिकी महाविद्यालया सोबतच सर्व संस्थांना स्वायत्त दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्यास त्यांच्या जन्मदिनी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्याचे ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयीन प्राचार्यांनी ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्या, जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, प्राचार्य, नर्सिंग कॉलेज, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बी. फार्मसी व डी. फार्मसी कॉलेज, पिंटू उर्फ अनिल मगदूम डी. फार्मसी कॉलेज, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल, जे. जे.मगदूम जुनियर कॉलेज यासह ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्थानी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.
मुळात डॉ. विजयराज मगदूम यांची प्रतिमा एक समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत.तसेच ते अत्यंत सामाजिक संवेदनशील म्हणून परिचयाचे आहेत. आजतागायत त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जयसिंगपूर शहर परिसर व पंचक्रोशीत शैक्षणिक व सामाजिक कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिनी समाजातील विविध स्तरातील मान्यवर घटकांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने डॉ. विजयराज मगदूम यांना वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन l
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा