![]() |
✍🏼मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
कोल्हापूर : संविधान संवाद समिती महाराष्ट्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात पथनाट्याच्या माध्यमातुन 'मतदार जनजागृती अभियान' राबवले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी व योग्य प्रकारे मतदान व्हावे या उद्देशाने पथनाट्याच्या माध्यमातुन हे युवा तरुण गावोगावी मतदानासंबंधी प्रबोधन करत आहेत.
प्रबोधनातील मुद्दे -
*पैसे घेऊन मतदान न करणे आणि पैसे वाटणाऱ्या, पार्ट्या - दारू पाजणाऱ्या नेत्याला मतदान न करणे.
*जाती धर्माच्या नावावर मतदान न करता मूलभूत गरजा आणि शाश्वत विकासावर भाष्य करणाऱ्या नेत्याला निवडा.
*सुशिक्षित आणि नितिवान नेत्यालाच निवडा
*नेत्यांना त्यांच्या ध्येय धोरणाबद्दल प्रश्न विचारूनच त्यांना मत द्यायचे की नाही हे ठरवा
*मतदान हे नागरिकांचे देशाप्रती सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आणि अधिकार आहे - त्यामुळे मतदानाचा हक्क बजावाच
*शिक्षण, रोजगार, गाव - शहरांचा शाश्वत विकास,सामाजिक सलोखा इत्यादी देशहिताच्या मुद्यांना समोर ठेऊनच मतदान करा.
मतदानासंबंधी अशा विविध मुद्द्यांना हात घालत हे मतदान जनजागृती अभियान सुरू आहे.
राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेले कमी मतदान हे अस्वस्थ करणारे आणि लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे आम्ही आणखी जोमाने मतदान जनजागृती करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मतदान होईल अशी आशा आणि ईच्छा आहे.
- रेश्मा खाडे, अंनिस
या मतदान जनजागृती मोहिमेत रेश्मा खाडे,प्रतिज्ञा कांबळे,वैष्णवी पोतदार,मानसी बोलुरे,महेश ओलेकर,तनिष्क जगतकर,अंशुमन सुलगावे,हरी आवळे,कैवल्य शिंदे, राहुल शिंगे इत्यादी तरुण कार्यकर्ते सहभागी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा